अखेर धसांची कबुली! देशमुख हत्येनंतर आक्रोश मोर्चाच्या नावाखाली पैसे गोळा करणारा माझाच कार्यकर्ता पण…

Suresh Dhas Confession on collected money in Akrosh Morcha after Deshmukh’s murder : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर आक्रोश मोर्चे काढण्यात आले. यावेळी सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला आशिष विशाळ या व्यक्तीने देशमुख कुटुंबियांना मदत करायची असं म्हणत अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले होते. असा आरोप मराठा आंदोलकांनी त्याच्यावर केला होता. त्यानंतर त्याला मारहाण देखील झाले होते.
या व्यक्तीवरून सुरेश धस यांचा तो कार्यकर्ता असल्याने धसांवर प्रचंड टीका देखील झाली होती. एकीकडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या बाजूने आणि वाल्मीक कराड तसेच मुंडे कुटुंबीयांवर या प्रकरणावरून दररोज हल्लाबोल करणारे सुरेश धस या कार्यकर्त्यामुळे मात्र अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांनी आपला त्याच्याशी संबंध नसल्याचे म्हटलं होतं.
मात्र आता आशिष विशाळ हा आपला सहकारी असल्याचे सुरेश धस यांनी मान्य केलं आहे. मात्र तो कुणाच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करत होता. तसेच त्याच्याकडे दोन कोटींची एफडी आणि 18 लाखांची कार कुठून आली. असा प्रश्न विचारला जातोय. दुसरीकडे गेली काही दिवसांपासून शिरुर तालुक्यातील सतीश भोसले उर्फ (Khokya ) खोक्या चर्चेत आहे. त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले. तसंच, काही लोकांना मारहाण केली म्हणून तो चर्चेत आला. त्याचबरोबर भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणूनही त्याची मोठी चर्चा झाली.
मोठी बातमी! रशिया युक्रेन युद्ध थांबणार; ट्रम्प यांचा प्रस्ताव रशियाला मान्य..
त्याला काल प्रयागराजच्या विमानतळावरून अटक केल्याची माहिती मिळतेय. पैशांची उधळण, हेलिकॉप्टर सवारी आणि वेगवेगळ्या रील्समधून सतीश भोसलेचे (Satish Bhosale) कारनामे समोर आलेत. तेव्हापासूनच पोलीस त्याच्या मागावर होते, अखेर त्याला काल बेड्या ठोकल्या.