ठाकरेंचे 15 आमदार अन् 25 नगरसेवक जाणार; थेट तारीख सांगत हिंदुस्तानी भाऊचा खळबळजनक दावा
Thackerys MLAs Hindustani Bhau's sensational claim हिंदुस्तानी भाऊ या सोशल मिडिया एन्फ्लुएन्सरने एक व्हिडीओ शेअर करत खळबळजनक दावा केला आहे.
Thackery will lose 15 MLAs and 25 corporators ‘Hindustani Bhau’s sensational claim, specifying exact date : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या आमदार खासदारांचं ऑपरेशन टायगर सुरू आहे. त्यात अगोदर ठाकरेंच्या साह खासदारांनी शिंदेंच्या सेनेते प्रवेश केला. त्यानंतर ठाकरेंना दुसरा धक्का दिला तो सचिन आहिर यांनी त्यातच ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक देखील फुटणार असल्याच्या चर्चा आहेत.
‘विश्वचषक फिक्स आहे; अर्जेंटिना जिंकेल’ ; इजिप्शियन फुटबॉलपटूचा फिफावर मोठा आरोप
त्यात आता हिंदुस्तानी भाऊ या सोशल मिडिया एन्फ्लुएन्सरने एक व्हिडीओ शेअर करत खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी थेट तारीख सांगत ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक देखील फुटणार आहेत. असा दावा केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे हिंदुस्तानी भाऊने भांडूपचा अनिल कपूर म्हणत संजय राऊतांना देखील टोला लगावला आहे. कारण त्यांनी या फुटलेल्या लोकांना बाळासाहेबांनी तुडवायला सांगितले होते असं म्हणत ऑपरेशन तुडवाचं आवाहन केलं होतं. त्यावरू त्यांना देखील हिंदुस्तानी भाऊने चांगलेच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं.
थेट तारीख सांगत हिंदुस्तानी भाऊचा खळबळजनक दावा
उद्धव साहेब मी मध्ये सांगितलं होतं की, सांभाळा नाहीतर 15 आमदार आणि 25 नगरसेवक जाण्याच्या मागे आहेत. त्यात पहिला बॉम्ब फुटला तो सचिन आहिर यांचा तर आता सप्टेंबरपर्यंत खूप काही जाणार आहे. 7 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा या दिवशी खूप काही जाणार आहे. तुमचा अनिल कपूर म्हणतोय की आता तुडवा ऑपरेशन सुरू करणार पण सचिन आहिर कोण आहेत माहिती आहे ना? सात रस्ता दगडी चाळचं नाव ऐकलं? अरूण भाई गवळी उर्फ डॅडी बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे माहिती आहे ना की, तुमच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे गवळी आहे.
View this post on Instagram
तर हा भांडूपचा खोटा अनिल कपूर आहे ना त्याला आता तरी तोंड बंद करायला सांगा. नाही तर त्याचं तुडवा ऑपरेशन सुरू होईल. असं म्हणत हिंदुस्तानी भाऊ ठाकरेंच्या आमदार फुटण्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.