मोठी बातमी: निवडणूक आयोगात शरद पवार गटाचे उत्तर दाखल, अजित पवार गटाचे सगळे दावे फेटाळले
Ajit Pawar Vs Sharad Pawar: राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार गटाने पक्षावर दावा केला होता. त्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली होती. शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड चुकीचं असल्याचा दावा अजित पवार गटाने केला होता. परंतु अजित पवार गटाचा दावा शरद पवार गटाने फेटाळला आहे.
निवडणूक आयोगात शरद पवार गटातर्फे उत्तर दाखल केले आहे. यात अजित पवार गटाचे सगळे दावे फेटाळले आहेत. मंत्र्यांशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात सुद्धा अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. नऊ मंत्र्यांच्या शिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली असून यात यातले 4 विधान परिषद आमदार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘विखे पाटील खंडोबाचा आशिर्वाद समजा..,’; भंडारा उधळताच गोपीचंद पडकरांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू झाली आहे. परंतु निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. दोन्ही बाजूची उत्तरे ऐकल्यानंतरच निवडणूक आयोग पुढील निर्देश देणार असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवारांनी 2 जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे.
अजित पवार गटाला देखील आजच उत्तर दाखल करायचे आहे. मात्र अद्याप त्या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. या शिवाय अजित पवार गटाने केलेले दावे देखील शरद पवार गटाने फेटाळले आहेत. 2022 मध्ये जी राष्ट्रीय कार्यकारणी झाली त्याचे देखील दाखले देण्यात आले आहे. त्या प्रक्रियांचे पालन केल्याची माहिती निवडणूक आयोगात दिली आहे.