भर सभागृहात मंत्री विखे-पाटील गाढ झोपले; गोऱ्हेंनी केली कोटी

भर सभागृहात मंत्री विखे-पाटील गाढ झोपले; गोऱ्हेंनी केली कोटी

मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. अधिवेशनादरम्यान, होणाऱ्या वादळी चर्चा, सत्ताधारी, विरोधकांमध्ये होणारी खडाजंगी हे नेहमीचेच विषय असतात. मात्र, कधीकधी काही भलत्याच कारणांसाठी विधिमंडळातील लोकप्रतिनिधी चर्चेचा विषय ठरतात. असाच काहीसा प्रकार आज विधानपरिषदेत घडला. महसूल व पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना (Radhakrishna Vikhe Patil) आज अधिवेशनाच्या सत्रात डुलकी लागली होती. (The revenue department’s bill camebut minister Radhakrishna Vikhe Patil slept soundly in the session)

राष्ट्रवादीचे सभागृह नेते एकनाथ खडसे यांचे विधान परिषदेतील भाषण संपले. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा विधेयक मांडण्यासाठी पुकारा केला. मात्र, त्यावेळी विखे पाटील त्यांच्या आसनावर गाढ झोपले होते. गोऱ्हे यांनी महसूल व पशुसंवर्धन मंत्री, सन्माननीय विखे पाटील असा दोनवेळा आवाजही त्यांना दिला. मात्र, विखे गाढ झोपी गेले होते. त्याचवेळी एका सदस्याने मोठ्या आवाजात विखे पाटील साहेब अशी हाकही मारली. त्यानंतर विखे पाटील जागे झाले आणि त्यांनी आपल्या विभागाचं विधेयक मांडले.

बदल्यांचा धडाका ! पुन्हा राज्यातील अठरा आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

काही भाषणांचा परिणाम होतो, अशी कोटीही उपसभापती गोर्‍हे यांनी या वेळी केली. खडसे साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, असं म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांनी केलेल्या भाषणाबद्दल हातही जोडले. मात्र, विखेंची ही डुलकी आणि बेफिकीरी चर्चचा विषय ठरली होती. झोपेतून जागे होऊन विखे पाटील यांनी विधानसभेचे विधेयक 36 महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 यावर विचार करण्यासाठी नेमलेल्या संसदीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी निश्चित केलेली मुदत पुढील विधान परिषदेच्या अधिवेशनाच्या अखेरपर्यंत वाढवण्यात यावी, असा प्रस्ताव विखे पाटील यांनी मांडला.

नीलम गोऱ्हे यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांना या विधेयकावर भाषण करायचे आहे का, असा सवाल केला. त्यावर काही गरज नाही, असं म्हणत विखे पाटील यांनी विधेयकावर भाषण केले नाही. दरम्यान, विखे पाटील यांनी मांडलेले विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube