दानवेंची दुसरी कन्या ही राजकारणाच्या व्यासपीठावर, लोणीकरांना शह देणार ?

दानवेंची दुसरी कन्या ही राजकारणाच्या व्यासपीठावर, लोणीकरांना शह देणार ?

जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची दुसरी कन्या पहिल्यांदाच राजकारणाच्या व्यासपीठावर दिसली. जालन्यात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा वतीने महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मोठ्या कन्या आशा पांडे, यांच्या सह दृतीय कन्या उषा आकात ही पहिल्यांदाच राजकारणाच्या व्यासपीठावर दिसली.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मोठ्या कन्या आशा पांडे आणि सर्वात लहाल कन्या संजना म्हणजेच हर्षवर्धन जाधव या दोघीही राजकारणात सक्रिय आहेत. तर आता या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची दुसरी कन्या उषा आकात ही पहिल्यांदाच राजकारणाच्या व्यासपीठावर दिसली. उषा आकात या राष्ट्रवादी काँगेस चे स्वर्गीय माजी आमदार वैजिनाथ आकात यांची सून आहेत.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची दुसरी कन्या उषा आकात यांनी गळ्यामध्ये भाजपचा रुमाल घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय वर्तुळातून विविध चर्चाना उधाण आलं आहे. की, मंठा- परतूर विधानसभा मतदार संघावर भाजपच्या माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचं वर्चस्व आहे. त्यांतच जिल्हा कार्यकारणी वरून दानवे आणि लोणीकर गटात वाद आहे. त्यांतच लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष झाल्याने बबनराव लोणीकर परभणी लोकसभा तर राहुल लोणीकर मंठा-परतूर विधान सभा लढतील अशी चर्चा असताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लोणीकर पिता पुत्रांना शह देण्यासाठी आपली दुसरी कन्या उषा आकात यांना राजकारणात आणल्याच्या चर्चा रंगायला सुरवात झालीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube