भ्रष्टाचार दडवण्यासाठी हिंदुत्वाची बनवाबनवी त्यांची नार्को टेस्ट करा; ठाकरेंच्या नेत्याचा नाव न घेता हल्ला

UBT Ahilyanagar Shaharpramukh Kiran Kale criticize NCP MLA Sangram Jagtap on Ahilyanagar Municiple Corporation Fraud : अहिल्यानगर मनपातील 776 रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे 350 ते 400 कोटींच्या महाघोटाळ्याच्या बाबतीत आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेला खुलासा पाहता ते मनपाचे आयुक्त आहेत की भ्रष्टाचाऱ्यांचे प्रवक्ते ? तुमच्या हाती आयुक्त म्हणून आम्ही शहर सोपवलय. मात्र तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्यामध्ये व्यग्र आहात. आपल्या कार्यालयात काय चाललंय हे जर आयुक्तांना माहीत नसेल तर ठाकरे शिवसेना त्यांचा अभ्यास वर्ग घेण्यासाठी कागदपत्रांसह सज्ज आहे, असा टोला लगावत शहर प्रमुख किरण काळे यांनी, आयुक्तांनी मनपाच्या प्रांगणात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर यावं. मी त्यांची शिकवणी घेऊन ते ज्या भ्रष्टाचाऱ्यांना वाचवत आहेत ते त्यांना पुराव्यानिशी दाखवून द्यायला तयार आहे, असे जाहीर आवाहन केले आहे. विकास कामां मधील भ्रष्टाचार दडवण्यासाठी त्यांची हिंदुत्वाच्या नावाने बनवाबनवी सुरू आहे. भगवा टिळा, भगवी टोपी, भगवा पंचा घालून शहराचे लोकप्रतिनिधी भगवद्गीतेत नैतिकतेने वागण्याच्या दिलेल्या उपदेशाच्या विरुद्ध वागत आहेत. हा भगव्याचा, हिंदुत्वाचा अपमान असल्याचा आरोप आ. संग्राम जगताप यांचे नाव न घेता काळे यांनी केला आहे.
तटकरे मैदानात उतरले! आठ जिल्ह्यांचा सखोल संवाद दौरा सुरू, मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढणार
किरण काळे त्यांनी उघड केलेल्या स्कॅम आणि तक्रारीनंतर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहिल्यानगर मधील स्कॅम बद्दल पत्र लिहून पुराव्यांची फाईल पाठवत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मनपा आयुक्त डांगे यांनी तात्काळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधत खुलासे केले होते. आ. जगताप यांनी देखील राऊत, शिवसेनेवर टीका करत चौकशी झाली असे म्हणत तसा भ्रष्टाचार झालाच नसल्याकडे अंगुलीनिर्देश केला होता. आयुक्त डांगे, आमदार जगताप यांच्या वक्तव्यानंतर शहर शिवसेना आक्रमण झाली असून शहर प्रमुख काळे यांनी पत्रकार परिषद घेत त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण कागदपत्रे, पुरावेच प्रसारमाध्यमां समोर मांडत दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवले आहे. यावेळी गौरव ढोणे, विलास उबाळे, महावीर मुथा, किशोर कोतकर, अनिस चुडीवाला, आकाश आल्हाट उपस्थित होते.
टीआरपी वाढवण्यासाठी आरोप, संजय राऊतांना गांभीर्याने घेऊ नका; जगतापांचा पलटवार
काळे म्हणाले, स्वतः आमदारांनी सांगितले आहे की निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या कामाशी त्यांचा थेट संबंध असल्याची कबुलीच त्यांनी दिली आहे. सर्व ठेकेदार हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत. जनतेच्या तिजोरीतील निधी हे मंत्रालयातून आणतात. मनपात जनता कर भरून कोट्यावधी रुपये जमा करते. यातून गरजेपेक्षा खूप अधिक वाढीव रकमांचे इस्टिमेट राजकीय दबावातून अधिकाऱ्यांशी संगणमत करून तयार करून घेतले जातात. या सगळ्यांमध्ये १० ते ४० पर्यंतची टक्केवारी आमदार आधी जमा करून घेतात. कारण ते खोक्यांच्या सरकारचे आमदार आहेत. त्यांच्या वरदहस्था शिवाय एवढा मोठा स्कॅम होऊच शकत नाही. आमदार, मनपा अधिकारी, ठेकेदार यांची नार्को टेस्ट करा. अशी मागणी काळे यांनी केली असून त्यात सगळे पोपटा सारखं बोलतील असा टोला लगावला आहे.
अरविंद भोसलेंची नवी कलाकृती, पथनाट्याने रंगला ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा!
संजय राऊत हे शिवसेनेचे राष्ट्रीय फायर ब्रँड नेते आहेत. ईडीच्या दहशतीला न जुमानता कोणताही गुन्हा न करता देखील तुरुंगवास भोगून आलेले क्रांतिकारक आहेत. त्यांच्यावर टीका करण्याची पात्रता आमदारांची नाही. त्यांची ती उंचीही नाही. यापूर्वी ज्या नितेश राणेंना त्यांची उंची नाही असं म्हणणारे आज त्याच राणेंच्या बाजूला जाऊन ते बसले आहेत. भगव्याच्या, हिंदुत्वाच्या नावाने भ्रष्टाचार करत आहेत. यामुळे अन्य धर्मीय नागरिकांसह हिंदू नागरिकांना देखील नागरि सुविधां अभावी त्रास होत आहे, असा आरोप काळे यांनी केला.
‘पोलिसांची परवानगी घेतली नाही’, चेंगराचेंगरीप्रकरणी आरसीबीवर गुन्हा दाखल करण्यास सरकारची मंजुरी
डांगे यांचा समाचार घेताना काळे म्हणाले, डांगेंनी भ्रष्टाचाऱ्यांची, आमदारांची प्रवक्तेगिरी सुरू केली आहे. शहराची कामे करण्यापेक्षा कलेक्शन एजंट असणाऱ्या राजकीय हस्तक, ठेकेदार यांच्याबरोबर अँटी चेंबरमध्येच त्यांचा सगळा वेळ जातो. भ्रष्टाचारांचा तो अड्डा झाला आहे. मी ८ मे २०२३ ला पहिले पत्र याबाबत मनपा आयुक्त यांना दिले होते. त्यानंतर १५ मे, २२ मे, २३ ऑगस्ट २०२३, १४ जुलै २०२५ अशी एक नाही तर अनेक पत्र दिली आहेत. मला मनपाने २५ मे, २६ मे, २९ मे, ३१ मे २०२३ अशी एक नाहीतर अनेक वेळेला कधी अतिरिक्त मनपा आयुक्त, तर कधी उपायुक्त यांच्या समितीची नेमणूक चौकशीसाठी नेमणूक केल्याचं लेखी कळवलं आहे.
नाना पटोलेंनी विधानसभेत फोडला ‘हनी ट्रॅप’चा बॉम्ब! पेनड्राइव्हमध्ये धक्कादायक गोष्टी
मी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर या घोटाळ्यात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा २०२३ मध्ये दिला होता. त्यावर मला आत्मदहनाच्या आदल्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनमध्ये मला ३१ मे २०२३ ला आयुक्तांच्या मान्यतेने उपयुक्त, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता निंबाळकर यांनी दीड महिन्यांच्या आत चौकशी पूर्ण करून दोषींवरती गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. एवढं सगळं सुरू असताना आयुक्त म्हणतात की अशी कोणती ही तक्रारच आलेली नाही. घोटाळा झालेला नाही. आयुक्त म्हणतात शासकीय तंत्रनिकेतनचे टेस्ट रिपोर्ट बनावट असल्याबाबत मनपाकडे कोणती ही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
‘विधानसभा अध्यक्ष दुतोंडी, ते पक्षपातीपणा करतात’; भास्कर जाधव संतापले, DCM शिंदेंचाही घेतला समाचार
तक्रार नाही. ३० जून २०२३ रोजी अर्धशासकीय पत्र शासकीय तंत्रनिकेतनने आयुक्तांना पाठवत पाच सदस्यांच्या समितीने चौकशी अंतिम ७७६ कामांमध्ये शासकीय तंत्रनिकेतनच्या नावाने बनावट टेस्ट रिपोर्ट जोडले असून पोलीस विभागाने सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याकरिता मनपाच्या ताब्यात असणाऱ्या गुन्ह्याच्या मूळ प्रति यांची मागणी केली होती. एवढेच नाही तर शासकीय निकेतनने आयुक्तांना १९ मे, २९ मे, २८ जून २०२३ ला याबाबत वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे. २२ जून २०२३ ला स्मरणपत्र देखील दिल आहे. मात्र याबाबतीत आयुक्तांचा खुलासा म्हणजे त्यांना त्यांच्या आकाकडून हा भ्रष्टाचार दडपण्यासाठी खोटी माहिती नागरिकांना देण्याचा आदेश झाल्यामुळे ते भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत.