Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत यावं, संदीपान भूमरेंची थेट ऑफर
औरंगाबाद : ‘निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याबद्दल आम्हाला विश्वास होता की, शिवसेना आणि धनुष्यबाण आम्हालाच मिळणार. कारण 40 आमदार, 13 खासदार, अनेक नगरसेवक, अनेक पदाधिकारी हे आमच्या सोबत आहेत. तर आता शिवसेनेत कोणी ठाकरे नसतील तरी काही फरक पडत नाही. कारण बाळासाहेब ठाकरे महत्त्वाचे बाकी ठाकरे नाही.’
खासदार Sanjay Jadhav भडकले : ‘मी दोन बापाची अवलाद नाही’
उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळण्याचं काही कारण नाही. कारण सहानुभूतीवर राजकारण चालत नाही. एखाद्या वेळी सहानुभूती चालते पण नेहमी नेहमी नाही. त्याला बाळासाहेबांचे विचार, काम हे सगळं लागतं. तर आता उद्धव ठाकरेंचा पक्ष राहिलाच नाही. त्यांचा गट वगैरे आता काही राहिलं नाही. त्यांना आता शिवसेनेत येण्याशिवाय पर्याय नाही.
त्यामुळे मी सांगण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी समजून घ्यायचं की जेव्हा पक्षातील 40 आमदार, 13 खासदार एका बाजूला जातात तेव्हा काय चूकलं. हे लाक मूळ शिवसेनेचे आहेत. आम्ही आधी शिवसैनिक आहोत. मग पदाधिकारी. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी विचार करावा. आता कोणी राहिलचं नाही. तर ठाकरे गटासोबत कोणी राहायला तयार नाही. त्यांच्याकडे राहिले तर दोघ बापलेकच राहतील. असं शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संदीपान भूमरे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत यावं अशी ऑफर दिली आहे.