Video : आंदोलनापेक्षा कबर उखडून टाकण्याची मागणी मोदींकडे करा; ठाकरेंनी थेट प्लॅन सांगितला

Video : आंदोलनापेक्षा कबर उखडून टाकण्याची मागणी मोदींकडे करा; ठाकरेंनी थेट प्लॅन सांगितला

Udhhav Thackarey on Devendra Fadanvis for Nagpur Voilence : औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील अनेक शहरात आंदोलन होत आहे. नागपूर शहरात देखील या मागणीसाठी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेकडून (VHP) आंदोलन करण्यात आला होता मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. यावरून उद्धव ठाकरे यांनी ही दंगल पुर्वनियोजित होती तसेच दवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.तसेच मोदींना सांगून थडगं काढून का टाकत नाही असा सवाल देखील ठाकरे यांनी केला.

नगर हादरले! दहा कोटींसाठी व्यापाऱ्याचा खून; निलंबित पोलिसासह एकाला बेड्या

ठाकरे म्हणाले की, औरंगजेबाचं समर्थन कोणीही करणार नाही. पण त्यात दंगल करण्यासारखे काय आहे? फडणवीस जर म्हणत असतील की, औरंगजेबाचं थगड त्यांना नाईलाजाने त्याचं संरक्षण कराव लागतय. तर मग मोदींकडे जा आणि ते थडगे काढण्यास सांगा. तसेच गृहमंत्री यांचे गृह नागपूर आहे. संघाचे मुख्यालय नागपूर आहे. डबल झेड सुरक्षा आहे. मग अशी घटना कशी घडते? नागपुरातील राडा पुर्वनियोजित कट होता का? मग त्याबद्दल अधीच काही माहिती का नव्हती?

अलर्ट ! 1 एप्रिलपासून ‘या’ मोबाईल नंबरच्या बँकिंग आणि UPI सेवा होणार बंद, कारण…

भाजपचे हिंदुत्व आम्ही पाहिले आहे पहिले तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून टाका. तसेच शिवरायांचा अपमान करणारे सर्वच ज्यामध्ये अबू आझमी, कोरटकर, सोलापूरकर आणि आता मोदींची शिवरायांशी तुलना करणारे या सर्वांची मिलीभगत आहे. हेच तर भाजपचे राजकारण आहे. एका बाजूला पुरावे काढायचे आणि एैऱ्या गैऱ्याची महाराजांशी तुलना करायची. एका बाजूला शिवरायांचा अपमान करायचा आणि दुसऱ्यांशी तुलना करायचा एकाला तरी फटकवायचे मग ह्यांची हिंमत होणार नाही.

नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

हे अपयशी सरकार आहे. फसवे सरकार आहे. यांनी ज्या थापा मारल्या. शेतकरी आत्महत्या केली कैलासने आत्महत्या केली. त्यांच्या बहिणीने म्हंटले की सरकारला राग वाटली पाहिजे भारत कृषी प्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या चिता जळत आहेत आणि तुम्ही थडग्याचा विषय करता. अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube