VIDEO : परळीत मोठा राडा! मुडेंच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्याला केली मारहाण
Dhananjay Munde Group Activist beat up Madhav Jadhav In Parli : राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) मतदानाची प्रक्रिया पार पडतेय. दरम्यान परळी मतदारसंघात मोठा राडा झाल्याचं समोर आलंय. परळीत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गटाच्या काही लोकांनी शरद पवार गटाच्या माधव जाधव यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होतोय. या घटनेमुळे परळीत मोठा गोंधळ उडाला आहे. गुप्त मतदानात ढवळाढवळ केल्याचा देखील आरोप केला जातोय.
परळीत लोकशाहीला धक्का आणि हुकुमशाहीने शिक्का? pic.twitter.com/hEIIWivtA8
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 20, 2024
राज्यातील कायदा सुव्यवस्था ऐवढी थंड झालीये की थेट विधानसभेचे उमेदवार आणि एक लोकप्रतिनिधी उघडपणे जीवे मारण्याची धमकी देतात. एवढा उन्माद कोणाच्या जीवावर होतोय याचा खुलासा होणे आणि अशा बेजबाबदार उमेदवारावर कठोर पोलिस कारवाई होणे ही सुजाण मतदारांची माफक अपेक्षा आहे. pic.twitter.com/SQQuy5I3cA
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 20, 2024
लोकशाहीच्या उत्सवात ठोकशाहीने मतांची बेगमी करणारे धनंजय मुंडे गटाचे गुंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस माधव जाधव यांना मारहाण करतात हे निंदनीय आहेच पण राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचे द्योतक सुद्धा आहे. अशा घटनांचा राष्ट्रवादी… pic.twitter.com/wgyvLgrEg7
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 20, 2024
यासंदर्भात सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, राज्यातील कायदा सुव्यवस्था ऐवढी थंड झालीये की थेट विधानसभेचे उमेदवार आणि एक लोकप्रतिनिधी उघडपणे जीवे मारण्याची धमकी देतात. एवढा उन्माद कोणाच्या जीवावर होतोय याचा खुलासा होणे आणि अशा बेजबाबदार उमेदवारावर कठोर पोलिस कारवाई होणे, ही सुजाण मतदारांची माफक अपेक्षा आहे.
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत किती मतदान झालं? एका क्लिकवर वाचा संपूर्ण अपडेट
लोकशाहीच्या उत्सवात ठोकशाहीने मतांची बेगमी करणारे धनंजय मुंडे गटाचे गुंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस माधव जाधव यांना मारहाण करतात, हे निंदनीय आहेचय पण राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचे द्योतक सुद्धा आहे. अशा घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करतो..! असं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलंय.
मोठी बातमी! शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर मध्यरात्री गोळीबार, श्रीरामपूरातील घटना
आज दुपारी 1 च्या सुमारास परळी विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांनी संपूर्ण मुंडे कुटुंबासह नाथ्रा येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आमदार पंकजाताई मुंडे यांच्यासह धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे, काकी प्रज्ञाताई मुंडे, माजी खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, राजश्रीताई धनंजय मुंडे, ऍड.यशश्रीताई मुंडे, युवक नेते अजय मुंडे, रामेश्वर मुंडे, नाथ्रा गावचे सरपंच अभय मुंडे, डॉ. संतोष मुंडे, बी-बियाणे राज्य समितीचे सदस्य अतुल मुंडे, सुरेश मुंडे, सचिन मुंडे, रामेश्वर तात्या मुंडे यांसह मुंडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील जनतेला मतांचा टक्का वाढवण्याचे आवाहन केले.