मोठी बातमी! शिक्षक, पदवीधरची निवडणूक पुढे ढकलली, ‘त्या’ संघटनांचा होता आक्षेप

मोठी बातमी! शिक्षक, पदवीधरची निवडणूक पुढे ढकलली, ‘त्या’ संघटनांचा होता आक्षेप

Vidhan Parishad Elections : राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election 2024)रणधुमाळी जोरात सुरु आहे.आणि त्यातच विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. आता शिक्षक, पदवीधरच्या चार मतदारसंघांसाठी (Teachers, Graduate Legislative Council elections)जाहीर झालेल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई(Mumbai), नाशिक आणि कोकण (Konkan)या विभागात या निवडणुका होणार होत्या. मात्र त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

PM Modi यांच्याकडून लोकसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल; पाहा काही क्षणचित्रे…

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, त्याचबरोबर मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या चार जागांसाठी येत्या 10 जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार होती. आणि 13 जूनला त्याची मतमोजणी केली जाणार होती. या चारही मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ हा 7 जुलैला संपणार आहे. त्यामुळे या निवडणुका जाहीर केल्या होत्या पण आता मात्र या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

अमेरिकेचा राग तरीही भारताने ‘चाबहार’ डील केलीच; चीन-पाकिस्तानलाही धक्का!

शाळांना सुट्ट्या असल्याने याचा परिणाम निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर या निवडणुका घेण्यात याव्या, अशा मागण्या काही शिक्षक संघटनांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, असं बोललं जातंय. आता या निवडणुका किती काळासाठी पुढे ढकलल्या? हे पाहावं लागणार आहे.

विधान परिषदेतील मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना ठाकरे गटाचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे आणि मुंबई शिक्षकचे कपिल पाटील तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघाचे किशोर दराडे यांच्या सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने देखील पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने येणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube