महायुतीला विदर्भात मोठा फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्व्हेने वाढवली डोकेदुखी
Vidhansabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली. राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी महायुतीकडून (Mahaytuti) रणनीती आखली जाते. मात्र, आता भाजपच्या (BJP) अंतर्गत सर्व्हेची आकडेवारी समोर आली. विदर्भात महायुतीला केवळ 25 जागा मिळतील, असं या सर्व्हेतून समोर आलं. त्यामुळं भाजपची चिंता वाढली आहे.
Sharad Pawar NCP : पुण्यात शरद पवारांची ‘जादू’? आठ मतदारसंघासाठी तब्बल 41 जण इच्छुक
2014 मध्ये राज्यात भाजपची सत्ता आणण्यात विदर्भाची महत्वाची भूमिका ठऱली होती. मात्र आता विदर्भातच भाजपची पीछेहाट सुरू झाली. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात महाविकास आघाडीला मोठे यश मिळालं. विदर्भातील 10 पैकी 7 जागांवर मविआच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर महायुतीला केवळ 3 जागा मिळाल्या. भाजपच्या जागा 5 वरून 3 वर घसरल्या. आता विधानसभेतही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
WHO कडून Mpox लसीला मान्यता, लसीकरणाची ‘या’ देशात होणार सुरुवात
विदर्भात महायुतीला केवळ 25 जागाच मिळणार
2019 मध्ये भाजपने विदर्भात विधानसभेत 62 पैकी 33 जागा जिंकल्या. भाजपने 29 तर शिवसेनेने 4 जागांवर विजय मिळवला होता. सध्या महायुतीत तीन पक्ष आहेत. विदर्भ महायुतीकडे सध्या 39 आमदार आहेत. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला केवळ 25 जागा यश मिळेल, असा भाजपचा अंतर्गत सर्व्हे सांगतो.
भाजपला 18 जागा मिळणार
2019 मध्ये 29 जागा जिंकणाऱ्या भाजपला 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपची धाकधूक वाढली. विशेष म्हणजे नागपुरातील 12 जागांपैकी केवळ 4 जागाच मिळतील, असं सर्व्हे सांगतो.
भाजपला 18, शिंदेसेना 5 जागा आणि अजित पवार गटाला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात महायुतीच्या जागा 14 ने कमी होतील, असा अंदाज आहे. अजित पवार गटाच्या आमदारांची संख्या 4 वरून 2 वर जाण्याची शक्यता आहे. मात्र शिंदे सेनेच्या आमदारांची संख्या 3 वरून 5 वर जाऊ शकते. त्यामुळे शिंदे यांना फायदा होत असल्याचे दिसत आहे.