‘बेटा, अजित कितना खाया?, सरदार 70 हजार कोटी…’; वडेट्टीवारांनी उडवली अजितदादा अन् मोदींची खिल्ली

‘बेटा, अजित कितना खाया?, सरदार 70 हजार कोटी…’; वडेट्टीवारांनी उडवली अजितदादा अन् मोदींची खिल्ली

Vijay Wadettiwar On Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर आतापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अशातच आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवा (Vijay Wadettiwar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवा (Ajit Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून त्यांनी या दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली.

बाजारात Jio Bharat J1 ची एंट्री, मिळणार UPI आणि लाइव्ह टीव्हीसह खूपकाही, किंमत फक्त … 

चांदवड येथे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना वडेट्टीवारांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून तोफ डागली. वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा अजित कितना खाया? सरदार 70 हजार कोटी खाया… अरे क्या बात है! बहुत खाया, ये ले तिजोरी की चाबी रख, अशा शब्दात वडेट्टीवारांनी अजितदादा आणि पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवली.

काही झालं तरी हजर राहणार नाही, ‘त्या’ प्रकरणात मनोज जरांगेंची भूमिका…

पुढं बोलताना वडेट्टीवार म्हणाले, भाजप सरकारने महागाई गगनाला नेऊन ठेवली आहे. खाद्यतेल 68 रुपये किलो दराने मिळत होतं. मात्र आज तेच तेल 150 रुपये किलो झालंय सर्व वस्तूंवर मोठ्या प्रमाणात जीएसटी लावला. साड्यांवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. माझी बहिणी जर 1000 रुपयांची साडी खरेदी करत असेल तर तिला 180 रुपये GST भरावा लागतो. आता लाडकी बहिण योजना आणता? अत्याचाराच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. महाराष्ट्राने उत्तर प्रदेश आणि बिहारलाही मागे टाकले आहे. सरकारने आधी बहिणींचे रक्षण केले पाहिजे, हीच खरी लाडकी बहिण योजना ठरेल, असं वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवारांनी तोंड आवारावं
वडेट्टीवार यांच्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी शोले स्टाईल प्रत्युत्तर दिलं. क्योरे सांभा, चंद्रपुर में दारू बंद करने के लिए कितने खाये..? और कितने आदमी थे, असा सवाल करत वडेट्टीवारांनी तोंड आवारावं, असा इशारा मिटकरांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube