Live Election Results 2026 : 5 राज्यांसह बारामती, राहुरीत उत्सुकता शिगेला! कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

election Result 2026 LIVE पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका त्याचप्रमाणे बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल देखील आहे.

Election Result

देशाच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. त्याचप्रमाणे बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल देखील आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. प्रादेशिक अस्मिता, विकासाचे मुद्दे आणि सत्तांतराची शक्यता यांवर लढल्या गेलेल्या या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

LIVE NEWS & UPDATES

  • 04 May 2026 12:19 PM (IST)

    दिल्ली मुख्यालयात आज सायंकाळी जल्लोष…

    दिल्ली मुख्यालयात आज सायंकाळी जल्लोष होणार आहे. पश्चिम बंगाल आणि आसामच्या विजयानंतर या जल्लोषाचे आयोजन होणार आहे..

  • 04 May 2026 12:17 PM (IST)

    राहुरी विधानसभा पोटनिवडणूक

    बाराव्या फेरी अखेर मिळालेली मते

    भाजप अक्षय कर्डिले - 61035
    राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 10762
    वंचित संतोष चोळके- 4234
    अपक्ष रावसाहेब खेवरे- 5896

    बाराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 50273 मतांनी आघाडीवर

  • 04 May 2026 12:17 PM (IST)

    बारामतीच्या बालेकिल्ल्यात सुनेत्रा वहिनींचा एल्गार; अभिजीत बिचुकलेला नोटा पेक्षा कमी मतदान, करुणा मुंडेंला किती मते?

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असून राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

    सुरुवातीपासूनच महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी जोरदार आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाचा फरक विक्रमी ठरणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

    सहाव्या फेरीअखेरचे आकडे पाहता, सुनेत्रा पवार यांना तब्बल 53,478 मते मिळाली आहेत.

    त्यांच्यापुढे इतर उमेदवार फार मागे पडलेले दिसत आहेत.

    अभिजीत बिचुकले 65 मते,

    करुणा मुंडे 68 मते,

    तर चंद्रकांत वाघमोडे यांना 30 मते मिळाली आहेत.

    याशिवाय नोटाला 153 मते.

    एकूण 54,490 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे.

    सध्याची परिस्थिती पाहता, सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असून, तो किती मोठ्या फरकाने होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी फेऱ्यांमध्ये हा फरक आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 04 May 2026 12:16 PM (IST)

    ममता बनर्जी यांना विधानसभेच्या निकाला मोठा झटका..

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. या निकालाने ममता बनर्जी यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे. टीएमसी 101 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 184 जागांवर आघाडीवर आहे.

  • 04 May 2026 11:51 AM (IST)

    Baramati : सुनेत्रा पवार यांनी ओलांडला 1 लाख मतांचा टप्पा

    -बाराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना 1 लाख 3 हजार 709 मतांची आघाडी
    -बाराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना 8,057 मतं
    -बाराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित
    -एकूण 23 फेऱ्यांपैकी 12 फेऱ्यांचे निकाल आले समोर
    -दुपारी 2.30 पर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता

  • 04 May 2026 10:43 AM (IST)

    आठव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 70642 मतांनी आघाडीवर

    आठव्या फेरी अखेर
    एकूण झालेले मतदन - 8831
    आ. वहिनींना
    झालेले मतदान - 8725
    इतर मते - 106

    आठव्या फेरी अखेर वहिनींना झालेले एकूण मतदान - 70642

    इतरांना गेलेली एकूण मते - 1289

  • 04 May 2026 10:39 AM (IST)

    पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी यांना थेट धक्का..

    पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचे बघायला मिळत आहे. ममता बनर्जी यांना मोठा धक्का पश्चिम बंगालमध्ये बसत आहे. ममता बनर्जी भवानीपूर येथे पिछाडीवर आहेत.

  • 04 May 2026 10:22 AM (IST)

    राष्ट्रवादीला धक्का! राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले यांनी घेतली मोठी आघाडी

    पाचव्या फेरीअखेरची आकडेवारी:

    अक्षय कर्डिले (भाजप): 25,408 मते

    गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस - SP): 3,522 मते

    रावसाहेब खेवरे (अपक्ष): 1,603 मते

    संतोष चोळके (वंचित बहुजन आघाडी): 1,438 मते

  • 04 May 2026 10:18 AM (IST)

    ममता बनर्जी तब्बल इतक्या मतांनी आघाडीवर, भाजपाला धक्का…

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. सुरूवातीच्या कलांनुसार, भवानीपूरमध्ये भाजपाला धक्का बसताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे भवानीपूरमध्ये ममता बनर्जी तब्बल 2 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

  • 04 May 2026 10:14 AM (IST)

    तामिळनाडूमध्ये ज्याचा विचारही कोणी केला नाही असे निकालात घडतंय..

    तामिळनाडूमधून धक्कादायक आकडे पुढे येत आहेत. विजय थलापती याच्या नव्या पक्षाला मोठे यश मिळत आहे. डीएमकेची सत्ता हातून जाण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

  • 04 May 2026 10:07 AM (IST)

    तामिळनाडूमधून धक्कादायक आकडे, डीएमकेला झटका…

    तामिळनाडूमधून धक्कादायक आकडे पुढे येत आहेत. डीएमकेच्या हातून सत्ता जाण्याचे संकेत आहेत. अभिनेता विजय थलापती याच्या नव्यानवख्या पक्षाला मोठे यश मिळत आहे. सुरूवातीच्या कलामध्ये हा मोठा धक्का म्हणावा लागेल.

  • 04 May 2026 10:06 AM (IST)

    भाजपाला भवानीपूरमध्ये धक्का, थेट ममता बनर्जी..

    भवानीपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा ममता बनर्जी आघाडीवर आहेत. बाकी राज्यात भाजपाची जोरदार कामगिरी बघायला मिळत आहे.

  • 04 May 2026 10:05 AM (IST)

    सुनेत्रा पवार 45010 मतांनी आघाडीवर

    पाचव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 45010 मतांनी आघाडीवर

  • 04 May 2026 10:03 AM (IST)

    पाचव्या फेरीअखेर भाजपचे अक्षय कर्डिले यांची मोठी मुसंडी; २१ हजार मतांची आघाडी

    राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली असून, सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. पाचव्या फेरीचा निकाल हाती आला असून कर्डिले यांनी तब्बल 21,886 मतांची भक्कम आघाडी घेतली आहे.

    पाचव्या फेरीअखेरची आकडेवारी:

    अक्षय कर्डिले (भाजप): 25,408 मते

    गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस - SP): 3,522 मते

    रावसाहेब खेवरे (अपक्ष): १,603 मते

    संतोष चोळके (वंचित बहुजन आघाडी): 1,438 मते

  • 04 May 2026 10:01 AM (IST)

    सुनेत्रा पवारांची 26773 मतांची आघाडी, अभिजीत बिचुकले, करुणा मुंडेंना किती मतं?

    आकडेवारी

    बारामती पोटनिवडणूक

    सुनेत्रा पवारांची 26773 मतांची आघाडी

    करुणा मुंडे 10 मते

    अभिजीत बीचुकले 7 मते

    नोटा 28

follow us