अडीच वर्ष घराबाहेर न पडणार्‍यांना योगींचा रोड शो काय समजणार

अडीच वर्ष घराबाहेर न पडणार्‍यांना योगींचा रोड शो काय समजणार

मुंबई : ‘उरल्या सुरल्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणतात, योगींचा रोड शो कशासाठी? आता यांना काय समजणार रोड शो? जे अडीच वर्षांत राज्यासाठी कधीच घराबाहेर पडले नाही. यांच्यासाठी एकच रोड शो होता, तो वर्षा ते मातोश्री, तोही कोरोना झालेला असताना आणि मुख्यमंत्रीपद गेल्यावर.’ अशी टीका भाजपा उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी खासदार संजय राउतांवर केली आहे. ‘घरात बसणारे बाहेर फिरणार्‍यांवर टीका करतात तेव्हा हसावे की रडावे कळत नाही. क्या तुम भी संजुभाऊ ?’ असंही यावेळी संजय पाण्डेय म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांचा मुंबई रोड-शो झाला. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी योगी यांच्यावर निशाणा साधला. उद्योगातील गुंतवणुकीसाठी चर्चा करत असतील, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. पण गुंतवणुकीसाठी रोड शो करत असतील तर हे आश्चर्यकारक असल्याचे राऊत यांनी म्हंटले.

त्यावर आता भाजपा उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी खासदार संजय राउतांवर चांगलीच टीका केली आहे. पाण्डेय म्हणाले की, अडीच वर्ष घराबाहेर न पडणार्‍यांना योगींचा रोड शो काय समजणार. त्यांच्यासाठी एकच रोड शो होता, तो वर्षा ते मातोश्री, तोही कोरोना झालेला असताना आणि मुख्यमंत्रीपद गेल्यावर. असं संजय पाण्डेय म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube