Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी-शिवसेनेचा ‘हा’ प्लॅन आमदारांना कळल्याने आमदार फुटले; बावनकुळेंचा दावा

Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी-शिवसेनेचा ‘हा’ प्लॅन आमदारांना कळल्याने आमदार फुटले;  बावनकुळेंचा दावा

Chandrashekhar Bawankule : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेत (Shiv Sena) बंड केलं. त्यांनी केलेल्या बंडामुळं ठाकरे सरकार अल्पमतात आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. शिंदेंनी शिवसेना फोडली, असे तेव्हा बोलल्या गेल्या. दरम्यान, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना एकनाथ शिंदे यांनी नाही, तर भाजप, अमित शाह यांनी फोडली, असं वक्तव्य केलं. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली. (When MLAs came to know about NCP-Shiv Sena plan, MLAs split; The claim of Bawankules)

आज माध्यमांशी संवाद साधतांना बावनकुळे यांना राऊतांनी केलेल्या आरोपाविषयी विचारले असता ते म्हणाले की,
संजय राऊतांबद्दल काय बोलायच? नितेश राणे हे त्यांना उत्तर देत असतातच. पण, मी बोलतो. कारण, त्यांनी आमच्या केंद्रीय नेतृत्वावर आरोप केले. खरंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे पन्नास आमदार बाहेर पडले नसते तर शिंदेंकडचे सगळ्या आमदारांना पुढच्या निवडणुकीत हरवण्याचा प्लॅन राष्ट्रवादीचा होता, असा दावा बावनकुळे यांनी केला.

पाटील, टोपे, पटेल अन् अजितदादा; वर्धापनदिनी सुप्रिया सुळेंनी केलं तोंडभरून कौतुक

बावनकुळे म्हणाले, आगामी काळात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री असं शिवसेना-राष्ट्रवादीचं ठरलं होतं. त्यासाठी राष्ट्रवादीचे 100 आमदार निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे आमदार पाडले जाणार होते. हे 30 आमदार कोणते पाडायचे, तर ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पालकमंत्री होते, तिथले आमदार पाडण्याचा प्लॅन होता. आदिती तटकरे यांनीही रायगडमधील तीन आमदार कसे पडतील, याचा प्लॅन तयार केला होता, असं ते म्हणाले.

बावनकुळे म्हमाले, पुढच्या काळात आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्यासाठी आम्हाला जाणून-बुजून पाडलं जाणार असं आमदारांना कळलं असेल. भाजपने किंवा अमित शाह यांनी शिवसेना फोडली नाही. उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीसोबत कुठलीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळं आपण संपून जाऊ, असं वाटल्यानं आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकनाथ शिंदेंसोबत हे आमदार बाहेर पडले आणि त्यांनी भाजपसोबत नैसर्गिक युती केली. शिवसेनेचे आमदार बाहेर पडावे, सेनेत फुट पडावी, यासाठी भाजपने कुठलंही षडयंत्र केलं नाही. शिंदेंना वाटलं की, ठाकरे संपवतील म्हणून त्यांनी बंड केलं, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube