आमदारांच्या बैठकीचं मला निमंत्रणच नव्हतं; पण पक्षनेतृत्व सांगेल, त्यालाच मत देईल…; झिशान सिद्दिकी कॉंग्रेससोबतच

आमदारांच्या बैठकीचं मला निमंत्रणच नव्हतं; पण पक्षनेतृत्व सांगेल, त्यालाच मत देईल…; झिशान सिद्दिकी कॉंग्रेससोबतच

Zeeshan Siddiqui : विधानपरिषद निवडणूकीपूर्वी (Legislative Council Elections) काँग्रेसने (Congress) बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला दोन आमदार गैरहजर राहिले होते. त्यामुळं या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता निर्माण झाली. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिक (Zeeshan Siddiqui)आणि जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar)यांनी पक्षाच्या बैठकीला दांडी मारली. त्यामुळं या आमदारांकडून क्रॉस व्होटिंग होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता आमदार झिशान सिद्दिकी यांनी मला कालच्या बैठकीचं निमंत्रणच नव्हतं, अशी प्रतिक्रिया दिली.

Vidhan Parishad Election Live Updates : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान 

झिशान सिद्दिकी यांनी मतदानापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कॉंग्रेसच्या बैठकीबद्दल गैरहजर का राहिलात? असा सवाल केला अशता ते म्हणाले की, कालच्या बैठकीला काँग्रेसने मला निमंत्रित केलं नाही. त्यांनी मला या बैठकीला का बोलावले नाही, हे त्यांनी सांगावं. मी काँग्रेसचा सदस्य आहे. आजही मी काँग्रेस पक्ष कार्यालयात जाणार आहे. नेतृत्वाकडून मला जो आदेश मिळेल, त्या व्यक्तीला मी मत देईन. मात्र मला कालच्या बैठकीला न बोलवण्यामागचा हेतू काय होता हे पक्षच सांगू शकेल. मला जर त्यांनी बैठकीला बोलावलंच नाही, तर मी तिकडे जाणार तरी कसा ? असा सवाल झिशान सिद्दिकी यांनी केला.

मला मताचा हक्क नाकारला मग गायकवाडांना का नाही?, भाजपकडून सत्तेचा गैरवापर, वेगवेगळा न्याय 

आमची मतं फुडणार नाहीत – वडेट्टीवार
दरम्यान, काँग्रेसची दोन नव्हे तर आठ मते फुटणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाच तर भाजपच्या उमेदवारांना तीन मते मिळतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे पहिल्या पसंतीच्या मतांवरच विजयी होऊ शकतात. यावर बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रात 31 जागा जिंकल्यामुळे वातावरण बदललं आहे. राज्यातील जनतेच्या मनात काय आहे, हे स्पष्ट झाले आहे. काल आम्ही बोलावलेल्या बैठकीत ३७ पैकी ३५ आमदार उपस्थित होते. या बैठकीला फक्त झिशान सिद्दीकी आणि जितेश अंतापूरकर उपस्थित नव्हते. मात्र तेही आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळं आमची मते फुटण्याचा प्रश्नच नाही,असं ते म्हणाले.

आम्हाला आमदारांना हॉटेलमध्ये डांबून ठेवावं लागत नाही. महायुतीच्या उमदेवारांना डांबून ठेवण्यात आलं होतं. लोकसभेच्या निकालानंतर महायुतीचे नेते भांबावले आहे, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube