राम मंदिरानंतर आता लक्ष्य पुण्येश्वराचे मंदिर! सुनील देवधरांचा पुणेकरांसाठी निश्चय

राम मंदिरानंतर आता लक्ष्य पुण्येश्वराचे मंदिर! सुनील देवधरांचा पुणेकरांसाठी निश्चय

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर उभे राहू शकले. त्यानंतर आता पुणेकरांना देखील पुण्येश्वर मंदिर मिळालेच पाहिजे असा निर्धार भाजपचे (BJP) राष्ट्रीय नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानण्यासाठी आज (11 फेब्रुवारी) देवधर यांच्या नेतृत्वात पुण्यात ‘नमो पुणे अभिवादन बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले होते, त्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. (To thank Prime Minister Narendra Modi, under the leadership of Sunil Deodhar, a ‘Namo Pune Greeting Bike Rally’ was organized in Pune.)

यावेळी बोलताना देवधर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर उभे राहू शकले. त्यानंतर आता पुणेकरांना देखील पुण्येश्वर मंदिर मिळालेच पाहिजे. याशिवाय पुण्यातील नागरी समस्यांचे निराकरण, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही संकल्पबद्ध असून, पुण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित शहर बनवण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करुया आणि शपथ घेवूया.

अजितदादांनी हेरला लोकसभेचा प्रमुख शिलेदार : धनंजय मुंडेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

सुनील देवधर यांनी भगवा झेंडा दाखवल्यानंतर रॅलीला सुरवात झाली. या बाईक रॅलीत तीन हजारांहून बाईकधारक आणि पाच हजारांहून अधिक पुणेकर सहभागी झाले होते. महिला आणि युवतींची लक्षणीय संख्या होती. भाजपच्या डीपी रोड येथील कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात झाली. डी पी रोडवरून रॅली म्हात्रे पूल – शास्त्री रोड- माधवराव पेशवे रोड – बाजीराव रोड – शनिवार वाडा – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रोड – एफ. सी. रोड – ज्ञानेश्वर पादुका चौक मार्गे मॉडर्न इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या ठिकाणी येऊन सांगता झाली.

Sharad Pawar : ईडीच्या कारवाईत एकही भाजपाचा नेता नाही; शरद पवारांनी थेट आकडेवारीच मांडली

यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी खिचडीचा देखील आस्वाद घेतला. याप्रसंगी भाजपचे युवा नेते कुणाल टिळक, राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजप शहर चिटणीस महेश पवळे आणि दिनेश होले यांच्यासह हजारोंच्या संख्येने पुणेकरांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला. यामाध्यमातून देशाला राम मंदिर दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यात आले. सर्व पुणेकरांनी यावेळी नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube