गौतमीच्या ‘त्या’ व्हिडीओप्रकरणी नगरमधील अल्पवयीन मुलगा पुणे पोलिसांच्या ताब्यात
Gautami Patil Video Viral boy arrested : गेल्या काही दिवसांपासून आपल्या नृत्यामुळे प्रसिद्ध झालेली नृत्यांगना गौतमी पाटीलचा कपडे बदलत असताना व्हिडीओ काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल केल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
मुलगा अल्पवयीन असल्याने आई-वडील आणि मुलाला विमान नगर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
गौतमी पाटीलचा चेंजिंग रूममधील कपडे बदलत असतानाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. महिला आयोगाने देखील याप्रकरणी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पुढे पोलिसांनी तपास सुरू करत अहमदनगर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, 24 फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीने गौतमीचा कपडे बदलत असताना अर्धनग्न व्हिडीओ शूट केला होता. त्यानंतर तो व्हिडीओ काही विकृत मंडळींनी सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे याची राज्यभर चर्चा झाली. ही मंडळी इथेच थांबली नाही तर गौतमीच्या अन्य सहकाऱ्यांचे व्हिडीओ देखील व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली यामुळे गौतमी सोबत नृत्य करणाऱ्या एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
Gautami Patil : ‘का उगा घाई अशी…?’ म्हणत बैलासमोर गौतमीची लावणी
दरम्यान, आपल्या नृत्याच्या अदाकारीने गौतमीला प्रसिद्धी मिळाली. मात्र, त्यासोबतच तिच्या कार्यक्रमात होणारी हुलडबाजी किंवा तिने नृत्य करताना केलेल्या हावभाव यामुळे ती याआधी देखील चर्चेत आली होती. मात्र त्यावेळी तिने माफी मागून या वादावर पडदा टाकला होता. हा वाद शमला असतानाच गौतमीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे गौतमीची चर्चा राज्यभर झाली.
या प्रकरणी तिने सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्याबाबत पोलीस चौकशी करत असून एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.