Pune Accident: वाकडेवाडी एसटी स्टॅन्डजवळ अपघात; २७ टनचा मेट्रोचा कंटेनर कोसळला

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 08T105501.004

Pune Accident: वाकडेवाडी एसटी स्टॅन्ड याठिकाणी २७ टन चा मेट्रोचा कंटेनर कोसळला आहे. चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं कंटेनर रस्त्याच्या मधोमध कोसळला आहे. पुण्यामधील जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर कंटेनर उलटून अपघात घडला आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. हि वाहतूक सुरळीत करण्यासाठी एका लेन मधून दुहेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. क्रेनच्या मदतीने हा कंटेनर बाजूला करण्याचा काम सुरु आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाला नाही.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि तातडीने कोंडी हटविण्यासाठी प्रयत्न केले. मेट्रो अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यास आली. अवजड कंटेनर उलटल्यानंतर क्रेन मागविण्यात आली. क्रेनचावापर करून अवजड कंटेनर बाजूला काढण्यात आला.

Tags

follow us