Video : बाबासाहेब पाटलांमुळे जवळ आलेले दादा अन् पवार दुरावले?; पुण्यात मंचावर काय घडलं?

  • Written By: Published:
Video : बाबासाहेब पाटलांमुळे जवळ आलेले दादा अन् पवार दुरावले?; पुण्यात मंचावर काय घडलं?

पुणे : राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर मध्यंतरी अजित पवारांनी शरद पवारांची (Sharad Pawar) त्यांच्या दिल्लीतील निवास्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली होती. त्यानंतर आज पुण्यात पुन्हा दादा आणि पवार एका बैठकीसाठी एकाच मंचावर आलो होते. यात विशेष बाब म्हणजे अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवारांची बैठकीसाठीची खूर्ची शेजारी शेजारीच ठेवण्यात आली होती. त्यामुळे काका आणि पुतण्या जवळ येणार अन् चर्चा होणार याुमळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण, ऐनवेळी यात बदल झाला अन् बैठकीच्या निमित्ताने का होईना एकत्र आलेल्या दादा अन् पवारांमध्ये दुरावा आला. याबाबत अजितदादांना प्रश्न विचाण्यात आला असता त्यांनी मंचावर नेमकं काय घडलं याबाबत खुलासा केला आहे. (Ajit Pawar Sharad Pawar Meets In Pune Meeting)

एकनाथ शिंदेंची नाराजी जुनीच.. कधी त्याग तर कधी लॉटरीच; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी

अन् बाबासाहेबांमुळे निर्माण झाला दुरावा

त्याच झालं असं की, आज पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. बैठकीसाठी आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, त्या बैठक व्यवस्थेत अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते. मात्र, त्यानंतर अचानक सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची खूर्ची पवारांच्या बाजूला ठेवण्यात आली.

अखेर पुनित बालन अन् शरद पवारांच्या भेटीचे कारण आले समोर

अजितदादांनी मंचावर घडलेलं सांगितलं 

वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटच्या बैठकीत आसन व्यवस्थेबाबत अजितदादांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अचानक आसन व्यवस्था बदलण्यात आली असं काही नाही. सहकारमंत्री बाबासाहेब यांना साहेबांशी काहीतरी बोलायचं होत. त्यामुळे बाबासाहेबांना माझ्या आणि साहेबांच्या मध्ये बसवलं असे दादा म्हणाले. मी साहेबांशी केव्हाही बोलू शकतो असे म्हणत मी तिथं जरी असलो तरी मला बोलता येतच होतं ना तसंच माझा आवाजच असाआहे की दोन खूर्च्या मध्ये असल्या तरी तिसऱ्या व्यक्तीला ऐकू जातं. त्यामुळे ही काही बातमी होऊ शकत नाही असा मिश्किल टोलादेखील त्यांनी माध्यमांना लगावला. बाबासाहेब पहिल्यांदाच सहकारमंत्री झाले त्यामुळे मी त्यांचा आदर केला असेही दादांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube