दाहकता लक्षात घ्या अन्…; घाबरलेल्या पुणेकरांसाठी शरद पवार मैदानात; केली महत्त्वाची सूचना

  • Written By: Published:
दाहकता लक्षात घ्या अन्…; घाबरलेल्या पुणेकरांसाठी शरद पवार मैदानात; केली महत्त्वाची सूचना

Sharad Pawar X Post On Pune Viarl GBS Viral Disease : ‘जीबीएस’ अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे संशयित रूग्ण पुण्यात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीच्या वातावरणात शरद पवारांनी (Sharad Pawar) मैदानात उतरत राज्य सरकारला नव्या व्हायरसची दाहकता लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत पवारांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.

पवारांची पोस्ट काय?

‘जीबीएस’ अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुणे शहर आणि शहरालगत काही भाग विशेषतः सिंहगड रस्त्यावरील पुणे मनपामधील नवी समाविष्ट गावांमध्ये नागरीक बाधित झाल्याचे निदर्शनात आले आहे. या दुर्मीळ आजाराची दाहकता लक्षात घेता आणि नागरीकांमध्ये वाढलेले भीतीचे वातावरण ही एक चिंतेची आणि गंभीर बाब म्हणावी लागेल. दूषित पाण्यातून या आजाराचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन व राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता योग्य ती खबरदारी घ्यावी. संभाव्य संकटाचे अतिदक्षतापू्र्वक योग्य नियोजनातून निराकरण करण्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे.

अखेर पुनित बालन अन् शरद पवारांच्या भेटीचे कारण आले समोर

काय आहे गुइलेन बॅरे सिंड्रोम

जागितक आरोग्य संघटनेनुसार गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. यामध्ये शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच मज्जातंतूवर हल्ला करू लागते. यामुळे स्नायू्ंमध्ये कमकुवतपणा येतो. स्नायू सुन्न पडतात त्यात वेदनाही होतात. या आजारात कधीकधी अर्धांगवायूचा झटका येण्याचीही शक्यता असते. या आजाराचा फैलाव वेगाने होत असला तरी रुग्ण लवकर बरे देखील होतात. परंतु, रुग्णांना बरे होण्यासाठी लागणारा वेळ मात्र वेगवेगळा असू शकतो.

आजार नेमका कसा होतो?

गुलियन बॅरे सिंड्रोम आजार कसा होतो याची माहिती अजून समोर आलेली नाही. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. मात्र यातील निम्म्या रुग्णांत व्हायरल किंवा अन्य संक्रमणांचा इतिहास दिसला आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे त्यांना या आजाराचा जास्त धोका आहे.

गुगलचं गणित पक्कं! खास टेक्निकने तयार होतो मॅप; AI चा सपोर्ट मिळतो का? जाणून घ्याच..

आजाराची लक्षणे काय, कशी ओळखाल

गुईलेन बॅरे सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार. यात स्नायू कमकुवत होतात.

स्नायू कमकुवत झाल्याने वेदना होतात, संवेदना कमी होतात.

चेहरा, डोळे, छाती शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो. तात्पुरता अर्धांगवायू तसेच श्वसनासही त्रास होतो.

हाताची बोटं, पायात वेदना होतात. चालताना त्रास, चिडचिडही होते.

कोणत्या वयात खरेदी कराल हेल्थ इन्शुरन्स? ‘या’ गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाच!

आजार कुणाला होऊ शकतो ?

हा आजार कुणालाही होऊ शकतो. शक्यतो 12 ते 30 वयोगटातील लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. काही वेळा वयस्कर व्यक्तींनाही लागण होते. हा आजार धोकादायक नाही त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोकनुसार हा एक दुर्मिळ आजार आहे. अमेरिकेत दरवर्षी एक लाख लोकांमध्ये एकाला या विषाणुची लागण होते.

या आजाराला ओळखणे कठीण आहे. यासाठी माहिती असलेली परीक्षण पद्धती नाही. अशा वेळी मांसपेशीत कमकुवतपणा, तांत्रिक संवेदना आणि संवेदी परिवर्तनाच्या तपासणीसाठी अनेक परिक्षणांची मदत घेतली जाते. संशय वाटल्यास डॉक्टर स्पायनल फ्लुइडच्या नमुन्यांची तपासणी करतात. यामध्ये फक्त प्रोटीनच्या पातळीची तपासणी होते. कारण जीबीएसच्या रुग्णांत प्रोटीनची पातळी उच्च असते.

गड्या , आपला BMI कंट्रोल केलेलाच बरा; जास्त वाढला तर ‘या’ आजारांचा धोका

आरोग्य अधिकारी काय म्हणतात ?

12 ते 30 च्या दरम्यानच्या वयोगटातल्या लोकांना हा आजार होतो. हा आजार धोकादायक नाही आणि घाबरून जाण्याचे कारण नाही. या आजारासंदर्भात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पुण्यात जे संशयित रुग्ण सापडले आहेत त्या रुग्णांची संपूर्ण माहिती घेण्यात आली आहे. या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचा कारण नाही. हा संसर्गजन्य आजार नाही. यासाठी वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही. नेहमीची जी ट्रीटमेंट असते तीच ट्रीटमेंट दिली जाते. तसेच लवकरात लवकर बरा होणारा हा आजार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube