अजित पवारांकडून माझ्या जीवाला धोका; नेत्याच्या पोलीस तक्रारीमुळे पुण्यात खळबळ

  • Written By: Published:
अजित पवारांकडून माझ्या जीवाला धोका; नेत्याच्या पोलीस तक्रारीमुळे पुण्यात खळबळ

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि अजित पवार (ajit pawar) यांच्या विरोधात पुण्यामध्ये पोलिसात पुणे भाजप नेत्याकडून तक्रार देण्यात आली आहे. अजित पवारांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. ही तक्रार शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात दिली आहे.

गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश असताना त्या ठिकाणी जबरदस्तीने मोजणी केली जात आहे. सदर प्लॉटच्या ताबा असल्याने सतत धमक्या येत आहेत. याबाबत ही तक्रार देण्यात आली असून पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे साळगावकरांनी तक्रारीत म्हटले आहे.

बच्चू कडूंच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री मैदानात, नाराजी दूर करण्यासाठी देणार ‘हे’ खास गिफ्ट

गणेश खिंड परिसरातील मोकळ्या जागेसंदर्भात तहसील कार्यालयातून या प्लॉटच्या संदर्भात पवार यांच्या नावाची चिठ्ठी लावली होती. तरी देखील तहसील कार्यालयातून साळगावकर यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहेत. या प्रकरणासंदर्भात साळगावकरांनी पवारांच्या विरोधात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी अर्ज स्वीकारला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या विरोधात ही तक्रार दाखल झाल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. आता यावर अजित पवार यांच्यावर काय कारवाई होते आणि महाविकास आघाडीचे नेते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Narhari Zirwal : पांढरा सदरा, गांधी टोपी आणि हिरवं लुगडं; जपान दौऱ्यापूर्वीचा झिरवळांचा लूक चर्चेत

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube