‘अजितदादा तुम्ही थोडा उशिरच केला, पण आता तुम्ही..,’ अमित शाहांचं मोठं विधान…

‘अजितदादा तुम्ही थोडा उशिरच केला, पण आता तुम्ही..,’ अमित शाहांचं मोठं विधान…

Amit Shah : अजितदादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात, हीच तुमची योग्य जागा, याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केला असल्याचं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर कार्यक्रमात केलं आहे.

पुण्यात आज केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. पोर्टलचं उद्घाटन मंत्री अमित शाह यांच्या करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. अजितदादांसमोरच त्यांनी हे विधान केलं आहे.

मणिपूर, हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट; राऊतांच्या गंभीर आरोपांनी खळबळ!

पुढे बोलताना ते म्हणाले, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझ्यासोबत ते पहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळं सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजित दादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहेत. हीच तुमची योग्य जागा आहे, याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केला असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात पद्मश्री विखे पाटलांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन साखर कारखान्यांची निर्मिती केली. या सहकार आंदोलनात मोठी ताकद आहे. छोट्या-छोट्या व्यक्तींच्या प्रगतीसाठी सहकार विभागाची मदत होत आहे.
त्यासाठीच आम्ही पोर्टलची निर्मिती केली असल्याचं ते म्हणाले आहेत.

मोठी बातमी : तोषखाना प्रकरणात इम्रान खान दोषी, न्यायालयाकडून 3 वर्षांची शिक्षा; लाहोरमधून अटक

पोर्टलच्या माध्यमातून तक्रारीही करता येणार असून सहकारी संस्थांचे कार्यालय संगणकीकृत करणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी यावेळी केली आहे. सहकारी संस्थांच्या संगणकीकृत केल्यानंतरच गती येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच सहकारीता आंदोलनाला पारदर्शकता हवी, पारदर्शक व्यवस्था समाजातील लोकांना जोडू शकणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube