Chinchwad by election : अमोल कोल्हेंच्या ‘शिट्टी’ने कलाटेंना ताकद, राष्ट्रवादीची डोकेदुखी

Chinchwad by election : अमोल कोल्हेंच्या ‘शिट्टी’ने कलाटेंना ताकद, राष्ट्रवादीची डोकेदुखी

पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad by-election) भाजप (BJP) विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये (NCP) यांच्यात मोठी चुरस सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) एका कृतीमुळे चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमात ‘शिट्टी’ वाजवत एकप्रकारे राहुल कलाटेंचा (Rahul Kalate) प्रचार केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे राहुल कलाटे ‘शिट्टी’ याच चिन्हावर निवडणूक लढवत आहे.

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील मैत्री पुणे जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. नागपूरच्या एका कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी शिट्टी फुंकून अप्रत्यक्षपणे राहुल कलाटे यांचा प्रचार केल्याची चर्चा चिंचवड मतदारसंघात रंगली आहे. अमोल कोल्हे यांचा तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाळासाहेब थोरातांच राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य

महाविकास आघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून अजित पवारांसह भाजपच्या विरोधात दंड थोपटल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी केली होती. परंतु, त्यांनी माघार घेतली नाही.

कलाटे यांच्यावर अजित पवारांसह शरद पवार यांनी देखील टीका केली होती. कलाटे यांना वीस हजार मते पडतील असे भाकीत अजित पवारांनी भर सभेत व्यक्त केले आहे. असे असताना अमोल कोल्हे यांनी मात्र नागपूरच्या एका कार्यक्रमात राहुल कलाटे यांचे प्रचार चिन्ह शिट्टी वाजवून त्यांचा अप्रत्यक्षपणे प्रचार केल्याची चर्चा चिंचवड मतदारसंघात रंगली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube