मोठी बातमीः बाबा सिद्धीकी हत्याप्रकरणात पुण्यातून आरोपी अटक, हत्येच्या कटात सहभागी

  • Written By: Published:
मोठी बातमीः बाबा सिद्धीकी हत्याप्रकरणात पुण्यातून आरोपी अटक, हत्येच्या कटात सहभागी

Baba Siddique murder case Pravin Lonkar arrested : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते व माजी मंत्री बाबा सिद्धीकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील तिसऱ्या आरोपीला पुण्यात पकडले आहे. प्रवीण लोणकर असे आरोपीचे नाव आहे. ते हत्येचा कटात सहभागी असून, तो मुख्य सुत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठा उलगडा होणार आहे.

सिद्दीकी हे स्वप्न आणि प्रेमाने भरलेले जीवन जगले; निवडणूक रणनीतीकार अरोरा यांनी वाहिली श्रद्धांजली

बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर काही तासांत मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. गुलमित सिंग आणि धर्मराज कश्यप असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहे. गुलमित सिंग याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तर धर्मराज कश्यप याने आपण अल्पवयीन असल्याचा दावा केलाय. त्याच्या वयाबाबत खात्री करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणात मोठा ट्वीस्ट ! आरोपीच्या वयाची चाचणी होणार

तर या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचे नावे उघडकीस आले आहेत. सिद्धीकी यांच्या हत्येनंतर शुभम लोणकर याने एक पोस्ट फेसबुकवर शेअर करून ही हत्या लॉरेन्स बिष्णोई गँगने केल्याचा दावा केला होता. त्यानंतर पोलिसांनी शुभम आणि त्याचा भाऊ प्रवीण लोणकर या दोघांचा शोध सुरू केला. त्यातील प्रवीण लोणकर हा पुण्यात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक केली आहे. लोणकर बंधू हे बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

दोघे बंधू बिष्णोई गँगच्या संपर्कात
अकोला जिल्ह्यातील नेव्हरी (ता. अकोट) येथील शुभम लोणकर व त्याचा मोठा भाऊ प्रवीण लोणकर हे बिष्णोई गँगच्या संपर्कात होते. या दोघांचा अकोला पोलिसांनी मूळगावात शोध घेतला. परंतु दोघेही घरी आढळून आले नाहीत. त्यांच्या घराला कुलूप होते. जून महिन्यात ते घरसोडून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शुभम लोणकर हा पुण्यातील वारजेनगरमध्ये राहत होता. या गुन्ह्यात तो अटकेत आहेत. आता या गुन्ह्यात प्रवीण लोणकरला अटक झालीय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube