Big Breaking : पुण्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान स्टेज कोसळून 1 ठार तर 3 गंभीर जखमी…

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 06 04 At 9.48.30 PM

पुणे जिल्हातील लोणी काळभोर येथे आज रविवार दिनांक 4 जून रोजी बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रम दरम्यान स्टेज कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 1 जण जागीच ठार झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बाळासाहेब काशिनाथ कोळी (राहणार निनाम पाडळी, जिल्हा सातारा वय – 46) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नवं आहे. तर शुभम विजय लोखंडे, (वय -24) मयूर प्रमोद लोखंडे (वय -25), विकास वाल्मिक ढमाले (वय – 24) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.

Pune Rain : अहमदनगर, नाशिकनंतर पुण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर जवळील वडकी येथे आज बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. सायंकाळी अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाला. त्यामुळे लोकांची धांदल उडाली, पाऊस देखील असल्यामुळे लोक आश्रयासाठी स्टेजखाली गेले. परंतु वाऱ्यामुळे आणि पाऊसामुळे स्टेज खचले आणि ते कोसळले त्यामुळे यात आश्रयासाठी गेलेल्या चौघांपैकी एकाच मृत्यू झाला असून इतर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची स्थिती चिंताजन नसल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.

Tags

follow us