“देवेंद्र भाऊ सीएम म्हणजे मीच CM, पिंपरी चिंचवडसाठी त्यांनी..” आ. लांडगेंचा नाराजीला फुलस्टॉप!

Mahesh Landge on Minister Post : ‘मंत्रिपदाचं माझ्यासाठी काहीच नाही. देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री म्हणजे मीच मुख्यमंत्री आहे. मंत्रिमंडळ हा माझ्या दृष्टीने फार महत्वाचे नाही ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मिळेल. सर्व समीकरण जुळून येतील त्यावेळी महेश लांडगे सुद्धा तुम्हाला मंत्रिपदी दिसेल’, अशा शब्दांत भाजप आमदार महेश लांडगे यांनी मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज असल्याचा मुद्दा खोडून काढला. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पिंपरी चिंचवडचं राजकारण, पोलीस आयुक्तालयाचे भूमिपूजन, पिंपरी चिंचवडसाठी देवेंद्र फडणवीसांचं योगदान यावर भाष्य केले.
पिंपरी चिंचवडच्या आयु्क्तालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं चिंचवडसाठीचं योगदान जोरकसपणे सांगितले. त्यावेळी व्यासपीठावर अझजित पवार देखील उपस्थित होते. नंतर भाषणात अजित पवारांनी खंत व्यक्त केली की महेश लांडगे मला कसे विसरले याची आठवण करून देताच लांडगे म्हणाले, ‘नाही मी अजितदादांना कसं विसेरन? मी माझ्या भाषणात त्यांचंही नाव घेतलं होतं. अजितदादा मोठे नेते आहेत. राज्याचे उपमु्ख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल बोलण्याइतका काही मी मोठा नाही. ते भाषणात जे बोलले त्यामागचा त्यांचा उद्देश तसा नव्हता जे लोक आज बोलत आहेत.’
‘2014 नंतर ज्यावेळेस देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले. 15 ऑगस्ट 2018 ला पिंपरी चिंचवडसाठी पोलीस आयुक्तालय स्थापन झाले. पिंपरी चिंचवडला वेगळ्या आयुक्तालयाचा दर्जा देण्याचे काम फडणवीस यांनीच केले. त्यामुळे या आयुक्तालयाचे भूमिपूजन होतेय हे सांगण्याचा माझा उद्देश होता. या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद मला झाला. त्याच्या बाजूला एक सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे त्याची मान्यता सुद्धा देवेंद्र भाऊंनीच दिली. तिथे एक एक्झिबिशन सेंटर आहे. त्याच्या विकासाची सुरुवात त्यांनीच केली.’
पिंपरी चिंचवडला पाण्याचा फक्त एकच स्त्रोत पवना धरणाचा होता. दुसरा स्त्रोतही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच उपलब्ध करून दिला. आता या गोष्टी सांगितल्या म्हणजे मी दुसऱ्या कुणाचं नाव घेतलं नाही असा याचा अर्थ होत नाही.’ असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
भाग्यात असेल तर मंत्रिपद नक्कीच मिळेल..
पण आता तुम्ही देवेंद्र भाऊंचं कौतुक करता पण त्यांनी कुठं तुम्हाला मंत्रिमंडळात घेतले? या प्रश्नाचं उत्तर देताना लांडगे म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीसांनी कधीही कुणावरही चुकीच्या पद्धतीने आरोप केलेले नाहीत. सगळ्या समाजाला एकत्रित ठेऊन काम करण्याची त्यांची भूमिका पहा. पण काही लोकांनी त्यांची बदनामी करण्याची सुपारीच घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मुख्यमंत्री आहे. पक्षातील तळागाळातील कार्यकर्ता सुद्धा देवेंद्र भाऊ आहे. पिंपरी चिंचवडसाठी मंत्रिपद जेव्हा भाग्यात असेल त्यावेळी नक्कीच मिळेल’, असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला.
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही” ; देवेंद्र फडणवीस भरसभेत कडाडले
राष्ट्रवादीत होतो तेव्हाही शेंडी ठेवत होतो
आता कुणीच म्हणणार नाही की 2014 आधी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतात यावर ‘मी 2014 च्या आधीपासून शेंडी ठेवतोय आणि राष्ट्रवादीत कुणीच शेंडी ठेवत नाही असे मला वाटते. मी राष्ट्रवादीत होतो म्हणून माझ्या धर्माला त्रास होईल असे काही करतो होतो असे काहीच नाही. मला मतदान मिळावं म्हणून मी माझ्या धर्माच्या परंपरा सोडून दिल्या असे कधीच घडले नाही असे उत्तर भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिले.