पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटाची चाचणी; ATS ची धक्कादायक माहिती

पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटाची चाचणी; ATS ची धक्कादायक माहिती

कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी (terrorists) पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटांची चाचणी केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने (Anti-Terrorist Squad) न्यायालयात सादर केलेल्या अहवालात उघड झाले आहे. तसंच, आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम वाढ करण्यात आली आहे. (Bomb test by terrorists in forests of Pune Satara Kolhapur ATS information in court)

दोन्ही दहशतवाद्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपणार असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी सत्र न्यायाधीश एस. व्ही कचरे यांच्या न्यायालयाने त्यांना ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

तपासादरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेतली असता अनेक वस्तू सापडल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पांढरी पावडर आढळून आली. स्फोटक वेफर डिटेक्टरमध्ये ही पावडर स्फोटक असल्याचे समजले. यासोबतच पोलीस श्वान पथकानेही याबाबत सकारात्मक अहवाल दिला आहे. ही पावडर तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

काळीज पिळवटणारा व्हिडिओ! गरोदर महिलेचा आधी झोळी नंतर नदीतून ओंडक्याने प्रवास… 

घातपातासाठीच्या सर्व पातळ्या आत्मसाद
इस्लाममध्ये उपदेश केलेल्या पवित्र गोष्टींसाठी जीव गेला, तरी ते करण्यासाठी त्यांची तयारी होती. त्यानुसार, त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले होते. घातपातासाठी दहशतवादी विचारसरणी अंगीकारण्यापासून ते प्रशिक्षण आणि नंतर प्रत्यक्षात कारवाई करेपर्यंतच्या सर्व पद्धती या दोघांनी आत्मसाद केल्या होत्या. एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालात दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटांची चाचणी घेतल्याचा उल्लेख आहे.

– ISIS शी संलग्न अल-सुफा संघटनेच्या विचारसरणी माणणारे
– पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात दहशतवाद्यांकडून बॉम्ब चाचणी

– दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेली पावडर स्फोटक असल्याची पुष्टी एक्सप्लोसिव्ह व्हेपर डिटेक्टरने केली.

– पेन ड्राईव्हमधून देशविरोधी कृत्य करण्याचा इरादा असल्याचे उघड झाले

दोघेही आयसिसच्या अल सुफा संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

– पेन ड्राईव्हच्या माहितीचा 436 पानांचा तपास अहवाल न्यायालयात

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube