जानकरांचे मोठे वक्तव्य… छत्रपती संभाजीराजेसोबत करणार नवी युती

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 04 16 At 7.40.07 PM

Chatrapati Sabhajiraje And Mahadev Jankar New Alliance : आज पुणे येथे मराठी उद्योजकांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास छत्रपती संभाजीराजे व महादेव जानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात जानकर यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबत एकत्र येण्याचे संकेत दिले. यानिमित्ताने आता येत्या काळात महाराष्ट्रात अजून एक नवीन आघाडी पाहायला भेटणार आहे. जर हे दोघे एकत्र आली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण पाहायला भेटेल.

त्यामुळे आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष व महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र येणार का, याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष आहे.

Jitendra Awhad ; एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीची अंत्ययात्रा काढली

जो माणूस शुन्यातून मोठा होतो तोच इतिहासाचा मानकरी बनतो. तोच खरा इतिहास घडवणार आहे. असे यावेळी महादेव जाणकार म्हणाले ते पुण्यात उघोजक मेळाव्यात बोलत होते.

Tags

follow us