Chinchwad Bypoll Election Result : चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांचे लीड वाढलं.

Chinchwad Bypoll Election Result : चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांचे लीड वाढलं.

पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिंचवड विधानसभेच्या (Chinchwad Byelection) निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत होत असून सध्या भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आघाडीवर दिसत आहेत. नवव्या फेरीअखेर जगताप आघाडीवर असून त्या एकूण ३५२२८ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना एकूण ३५२२८ मते मिळाली आहेत.

नवव्या फेरीअखेर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत, तर नाना काटे याना 25205 मत आहेत, तर राहुल कलाटे याना 9945 मत मिळाली आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. भाजप उमेदवार जगताप या सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, या मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. कलाटे यांना तिकीट नाकारल्याने ते अपक्ष म्हणून उभे राहिले. या बंडखोरीचा फायदा भाजपला मिळताना दिसत आहे. दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे.

Chinchwad Byelection : राहुल कलाटे यांच्यामुळे नानांच्या विजयात काटे

मतमोजणीत या गोष्टींचा परिणाम दिसून येत आहे. जगताप यांना सहानुभूती तर आहेच. मात्र, त्याहीपेक्षा काटे आणि कलाटे यांच्यातील मतविभागणीचा त्यांना जास्त फायदा होत असल्याचे दिसत आहे. जगताप या आठव्या फेरीअखेर 5 हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. तर अपक्ष उमेदवार कलाटे यांनी दहा हजार मतांचा टप्पा पार केला आहे.

कलाटे यांना आठव्या फेरीअखेर 10 हजार 48 मते मिळाली आहेत. तर नाना काटे यांना 23 हजार 710 मते मिळाली आहेत. या मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर जगताप आणि काटे याच्या मतात फार फरक नाही. कलाटे आणि काटे यांच्या मतांची बेरीज जगताप यांच्या मतांपेक्षा जास्त आहे. नवव्या फेरीअखेर कोणता पक्ष किती मतांनी आघाडीवर? भाजप 3559 मतांसह आघाडीवर आहे, राष्ट्रवादी 2122 मतांसह आघाडीवर आहे. नवव्या फेरीअखेर भाजप एकूण 6356 मतांनी आघाडीवर आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube