सुप्रिया सुळेंची महावितरणकडे तक्रार, समोरून आले अजब उत्तर; काय घडलं वाचा…
सोशल मीडियाचा वापर अजून सगळेजण करत असतो, त्यावर आपण आपली मते तर मांडतोच पण आजकाल आपल्या तक्रारी करण्यासाठी देखील याचा वापर करतो. अगदी एकाद्या कंपनीकडून चांगली सर्व्हिस मिळाली नाही तर त्याची ट्विटरवर तक्रार आपण करतो आणि त्या कंपन्या ती तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करतात.
पण एखाद्या खासदाराने जर तक्रार केली तर काय होऊ शकत, असा कधी विचार केला आहे का? तेही जर सरकारी कंपनीला अशी तक्रार केली तर तुम्हाला काय अनुभव येऊ शकतो. काल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यातला लाईटचा प्रॉब्लेम लक्षात घेऊन तक्रार केली. त्याला उत्तरही आलं, पण या उत्तराची आता चर्चा रंगली आहे.
काल पुण्यात पाऊस पडला त्यानंतर अनेक भागात विजेचा प्रॉब्लेम निर्माण झाला, याची अडचण सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून मांडली. त्यांनी लिहलं होत की, “पुणे शहर व परिसरात गुरुवारी आलेल्या पावसामुळे बावधनसह अनेक ठिकाणी विजेचा खोळंबा झाला आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवठा कमी दाबाने होत आहे. याचा नागरीकांना त्रास होत आहे. महावितरणला विनंती आहे की कृपया आपण या संदर्भात तातडीने कार्यवाही करुन वीजसेवा सुरळीत करावी.”
पुणे शहर व परिसरात गुरुवारी आलेल्या पावसामुळे बावधनसह अनेक ठिकाणी विजेचा खोळंबा झाला आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवठा कमी दाबाने होत आहे. याचा नागरीकांना त्रास होत आहे. महावितरणला विनंती आहे की कृपया आपण या संदर्भात तातडीने कार्यवाही करुन वीजसेवा सुरळीत करावी.@MSEDCL
— Supriya Sule (@supriya_sule) April 14, 2023
Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते?
सुळे यांनी आपलं ट्विट महावितरणला टॅगही केलं होत, त्यामुळे त्यावर महावितरणकडून लक्ष घालण्यात आलं. नेहमीच्या पद्धतीने त्याला उत्तर दिले. जे सगळीकडून मिळतं. महावितरणने उत्तर दिल की “प्रिय ग्राहक, आम्ही तुमची समस्या लक्षात घेतली आहे आणि ती उच्च अधिकार्यांसह सामायिक केली आहे. संघ शक्य तितक्या लवकर त्याचे निराकरण करेल.”
https://twitter.com/MSEDCL/status/1646763250913091584
आता तुम्ही असं म्हणालं यात काय, सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आणि त्याला उत्तर मिळालं. पण आता मुद्दा असा आहे. एका खासदाराने ट्विट केलं त्याला ग्राहक म्हणून नेहमीच्या पद्धतीने उत्तर देणं, किती योग्य आहे.