Darshana Pawar Murde Case : फूड डिलिव्हरी ते दर्शनाची हत्या; पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

  • Written By: Published:
Darshana Pawar Murde Case : फूड डिलिव्हरी ते दर्शनाची हत्या; पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

MPSC Topper Darshana Pawar Murder Case Update : राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अखेर अटक केली आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. विविध शहरात फिरत असलेल्या राहुलला मुंबईतील अंधेरी मध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या सर्व घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे. राहुल हा पुण्यात पार्ट टाईम फुड डिलिव्हरीचे काम करत होता असेही चौकशीत समोर आले आहे, अशी माहिती अंकित गोयल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

PM Modi US Visit : ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो म्हणजे काय?; PM मोदींनी बायडेन यांना का दिली ही खास भेट, जाणून घ्या कारण

हत्या का केली?

प्राथमिक माहितीनुसार, दर्शनाने राहुलला लग्नासाठी नकार दिला होता. यातूनच राहुलने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. दर्शनाच्या मामाचे घर आणि राहुलचे घर समोरा समोर होते. तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत होते. राहुलदेखील MPSC परीक्षांची तयारी करत होता त्यासोबतच तो पुण्यामध्ये पार्ट टाईम फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याचे अंकित गोयल यांनी सांगितले.

Anil Ramod : पुण्यातील लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड अखेर निलंबित

दर्शनाच्या शरीरावर जखमा

पुढे बोलताना गोयल म्हणाले की, दर्शनाच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून काही गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यात तिच्या शरिरावर हल्ल्याचे व्रण असून डोक्यावरदेखील दगडाने वार केल्याच्या खुणा आहेत. घटनेच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता दर्शना आणि राहुलने राजगड किल्ला चढण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर साधारण 11.45 च्या सुमारास राहुल एकटाच खाली येताना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे. तेव्हापासून राहुल बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पाच पथकं विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती अखेर काल (दि.21) रात्री राहुलला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली आहे. त्याला आज कोर्टात हजर केले जाणार असून, त्याच्या चौकशीसाठी पोलीस कस्टडीची मागणी करणार असल्याचे गोयल यांनी सांगितले. त्यादरम्यान अधिकची माहिती समोर येईल असेही गोयल यांंनी यावेळी सांगितले.

लाईफ स्टोरी, शैक्षणिक अनुभव अन् मिळालेलं यश, दर्शनाने शेवटच्या भाषणात सांगितलं होतं…

पोस्टमॉर्टममधून धक्कादायक खुलासे

एमपीएससीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हिचा राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. या घटनेनंतर दर्शनासोबत गेलेला तिचा मित्र राहुल हंडोरे बेपत्ता होता. त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. ज्यात दर्शनाच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या होत्या. यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे अहवालामध्ये नमुद करण्यात आले होते. घडलेल्या घटनेमागे प्रथमदर्शनी संशयाची सुई दर्शनाचा मित्र राहुल हांडोरे याच्यावर होती. मात्र, तो घटनेच्या दिवसापासून बेपत्ता होता. त्याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 पथकं तयार केली होती. अखेर त्याला अंधेरीतून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

PM Modi US Visit : ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो म्हणजे काय?; PM मोदींनी बायडेन यांना का दिली ही खास भेट, जाणून घ्या कारण

कसा लागला राहुलचा शोध

दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल फारार झाला होता. तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत होता. हत्येच्या घटनेनंतर राहुलचा नंबर आधी मध्यप्रदेश, नंतर कोलकात्यात ट्रेस झाला होता. तर कधी तो चंदीगडमध्ये असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्याला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना नाशिकवरून त्याच्या नातेवाईकांना पुण्यात आणलं होतं. त्यांच्या मार्फत पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. तो वेगवेगळ्या सिम कार्डवरून तो घरच्यांना संपर्क साधत होता. त्याचे पैसे संपल्याने तो घरच्यांकडे पैसे मागत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरच्यांनी त्याला पैसे देखील पाठवयाल लावत होते. जेणेकरून त्याने एटीएमने पैसे काढल्यास त्याचे लोकेशन ट्रॅक केले जाईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube