Devendra Fadnvis : पिंपरी-चिंचवडमध्ये मुघलांसारखा शास्ती कर राष्ट्रवादीने लावला होता…

Devendra Fadnvis : पिंपरी-चिंचवडमध्ये मुघलांसारखा शास्ती कर राष्ट्रवादीने लावला होता…

पुणे : मुघलांच्या काळातला जो झिझिया कर होता, तसाच शास्ती कर फक्त पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने लागू केला होता, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत ते चिंचवडमध्ये बोलत होते.

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, मुघलांच्या काळात जसा झिझिया कर होता तसा शास्ती कर फक्त पिंपरी चिंचवड कर होता. राष्ट्रवादीचे सरकार असताना त्यांनी लावला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या प्रयत्नाने आम्ही 1 हजार स्केअर फूटापर्यंत कर माफ केला. त्यानंतर आम्ही विधानसभेत हा शास्तीकर रद्द करण्याच निर्णय घेतला आहे.

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे डबल इंजिन, अजित पवार-जयंत पाटलांचा ‘खतरनाक’ रोड शो

ज्या लोकांनी हा कर लावला ते काढू शकत नाहीत. याउलट ते म्हणतात, अजून जीआर नाही निघाला. अरे कर रद्द करण्याची आमची ताकद आहे तर जीआर काढायची देखील आमची ताकद असल्याचा खोचक टोला फडणवीस यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

Kasba By Election : अक्षय गोडसे यांनी घातला गोंधळ, आधी धंगेकरांना नंतर रासने यांना पाठिंबा

तसेच हा जीआर याआधीच निघाला असता मात्र, अचानक निवडणुका लागल्या आहेत. निवडणूक आणि आचारसंहितेमुळे जीआर काढणं थांबल आहे, निवडणूक होताच आम्ही या करासंबंधी जीआर काढणार असल्याचं आश्वासनंच देवेंद्र फडणवीसांनी चिंचवडकरांनी दिलं आहे.

Congress News : प्रदेशाध्यक्षाबाबत स्वत: नाना पटोलेंचं मोठं विधान…

पिंपरी चिंचवडमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी गरज आहे. 250 इमेलडी पाणी अंद्रा धरणातून आणले आहे. ते पुढील दोन महिन्यात शहराला मिळणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी करोडो रुपये शहरीकरणासाठी देत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

भावी महिला मुख्यमंत्री पोस्टरवरुन Supriya Sule संतापल्या; म्हणाल्या महिलेचा फोटो…

देशातील शहरं संधी निर्माण करतात. त्यांनी शहर बकाल केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता परिवर्तन करत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

या प्रचारसभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार धनंजय महाडिक, श्रीरंग बारणे, आमदार श्रीकांत भारतीय, महेश लांडगे, उमा खापरे, प्रा. राम शिंदे, भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube