कार्यकर्ते काय करतायत, विरोधकांना उत्तर देण्याची हिम्मत नाही का ? दिलीप वळसेंनी कार्यकर्त्यांना फटकारले
Dilip Walse Patil-फेक अकाउंट काढून बदनामी करण्यापेक्षा, ज्याला कुणाला बदनामी करायची आहे. त्यांनी स्वत:च्या अकाउंटवरून बदनामी करावी?
पुणे : जिल्ह्यातील मंचर दूध भेसळप्रकरण राज्यात गाजतंय. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दूध भेसळीप्रकरणात अडकले आहेत. याप्रकरणावरून ज्येष्ठ नेते व आमदार दिलीप वळसे पाटील यांना विरोधकांनी जोरदार घेरले आहे. त्यावर वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मंचर येथील जनसंवाद मेळाव्यात विरोधकांना जोरदार उत्तर दिले. तसेच विरोधकांनी सोशल मीडियावरून उत्तर न देणाऱ्या कार्यकर्त्यांनाही वळसेंनी फटकारले आहे.
स्वत:च्या अकाउंटवरून बदनामी करा-वळसेंचे विरोधकांना चॅलेज
सोशल मीडियावर फेक अकाउंट काढून बदनामी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. फेक अकाउंट काढून बदनामी करण्यापेक्षा, ज्याला कुणाला बदनामी करायची आहे. त्यांनी स्वत:च्या अकाउंटवरून बदनामी करावी? स्वत:च्या अकाउंटवर बदनामी केल्यानंतर बघा पुढे काय होते. तेवढी हिम्मत तुमच्यात नाही, असा आव्हान वळसे पाटील यांनी विरोधकांना केले आहे.
‘या’ दर्जाचे दूध राज्यातील शेतकरी घालू शकतो ? वळसे पाटलांनी एफडीएच्या एका नियमावर बोट ठेवले
…तर राष्ट्रवादीचे कामापुरते कार्यकर्ते
विरोधकांवर टीका करताना वळसे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना फटकारले. ते म्हणाले, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते काय करतात. तुमच्या नेतृत्वावर, तुमच्या पक्षावर चिखलफेक केली जात आहे. तुमच्यामध्ये एक सुद्धा माणूस समर्थ नाही का ? या सगळ्याला स्वत:च्या अकाउंटवरून सडतोड उत्तर द्यायचा. तुमच्यात हिम्मत नसेल, तर राष्ट्रवादीचे कामापुरते कार्यकर्ते आहे. बाकीचे गोष्टी अंगाला लावून घेणार नाही ते सांगा. चुकीच्या गोष्टीच्या विरोधात लढावे लागेल. विकासाच्या, सत्याचा बाजूला लढण्याचे काम सुरू करा. तुम्हाला पक्षावर होणारे हल्ले परतून लावताच आले पाहिजे. तरुण, ज्येष्ठ, महिला, पदाधिकारी असो सगळ्यांनी ते केले पाहिजे. आम्ही कुठेही असलो तरी आमचे लक्ष घारीसारखे येथेच असते, असे वळसे म्हणाले.
राम मंदिरातील चोरीवर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या वक्तव्याने नवा वाद, ट्रोलरला दिलं ‘हे’ उत्तर
आपल्या सरकारने कर्जमाफी केली आहे. सरसकट दोन लाखांची कर्जमाफी आहे. किमान त्याची तरी एक तरी पोस्ट आपल्या सोशल मीडियावरून टाकले का असा सवालही वळसे यांनी कार्यकर्त्यांना विचारला आहे.