NCP MLA in CM Shinde Car : राष्ट्रवादीच्या नाराज आमदाराचा मुख्यमंत्र्यांच्या कारमधून प्रवास; चर्चांना उधाण

NCP MLA in CM Shinde Car : राष्ट्रवादीच्या नाराज आमदाराचा मुख्यमंत्र्यांच्या कारमधून प्रवास; चर्चांना उधाण

पुणे : जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. कसबा आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकांचा (Kasba and Chinchwad By-elections)कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण (Politics)चांगलेच तापल्याचं दिसून येतंय. कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांवरुन महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) मतभेद होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) कारमधून प्रवास करताना दिसला आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. सध्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा हा प्रवास पुण्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरलाय.

राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार (Pimpri NCP MLA) अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारमधून मंत्रालय ते ठाणे असा प्रवास केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा असल्यानं या प्रवासाचं नेमकं कारण काय याबद्दल जोरदार चर्चा सुरु झालीय.

आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला महाविकास आघाडीच्या काळात अटक केली होती. या अटकेमुळं अण्णा बनसोडे राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा आहे. मध्यंतरीच्या काळात अण्णा बनसोडे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती.

त्याचबरोबर बनसोडे हे अजित पवारांच्या पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमांना देखील गैरहजर होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारमधून बनसोडेंचा प्रवास अनेक गोष्टींबद्दलची शंका उपस्थित करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube