Video : पुणे महापालिकेसमोर सदाभाऊ खोतांचा हायहोल्टेज ड्रामा; गेटवर चढून…

Video : पुणे महापालिकेसमोर सदाभाऊ खोतांचा हायहोल्टेज ड्रामा; गेटवर चढून…

Farmer Leader Sadabhau Khot :  राज्याचे माजी मंत्री व रयत क्रांतीकारी  संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुणे महापालिके समोर जोरदार आंदोलन केले आहे. महापालिकेच्या (Pune Municipal) अतिक्रमण विभागाने रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो जप्त करून त्याला तब्बल ४० हजार रूपयांचा दंड लावला आहे, त्यावरुन सदाभाऊ खोत हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुणे महापालिकेच्या गेटसमोर जोरदार आंदोलन केले आहे.

गेल्या ८ दिवसांपासून महापालिका या टेम्पो चालकाला गाडी सोडविण्यासाठी हेलपाटे मारायला लावत आहेत, यावरुन सदाभाऊ चांगलेच आक्रमक झाले आहेत. हे आंदोलन करत असताना आंदोलकांनी पुणे महापालिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथील सुरक्षा रक्षकांनी पालिकेचे गेट बंद करुन ठेवले होते. तेव्हा काहींनी त्या गेटवर चढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सदाभाऊ खोत हे देखील होते. त्यांनी पुणे महापालिकेच्या गेटवर चढून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला व ते आत महापालिकेत गेले . यावेळी सदर परिसरातली वातवरण हे अत्यंत तणावपूर्ण झाले होते.

अजितदादांना व्हायचंय मुख्यमंत्री; दिल्लीत लावली फिल्डिंग, पुण्यातले कार्यक्रम पुन्हा अचानक रद्द

आज आम्ही सदर शेतकऱ्यावर ती झालेल्या अन्याला वाचा फोडण्यासाठी व यापुढे कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय महानगरपालिकेकडून होऊ नये, याकरिता रयत क्रांती संघटना, जनसागर सरपंच असोसिएशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने शनिवार वाडा ते पुणे महानगरपालिका पर्यंत लक्षवेधी आंदोलन करत आहे, असे त्यांच्यावतीने सांगण्याता आले आहे. अशा कार्यवाही न थांबल्यास राज्यभर शेतकरी आणि रयत क्रांती संघटना यांच्यातर्फे अन्यायकारक कायद्यांच्या विरोधात कायदेभंग व असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

ठाकरे गटाला धक्का! मविआचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलला…

दरम्यान, महापालिका प्रशासनाने तातडीने ही कारवाई करणाऱ्या तसेच गाडी सोडण्यासाठी शेतकऱ्याची अडवणूक करणाऱ्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. यावेळी खोत यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी कांदे विकले. महापालिकेसमोर झालेले हे अचानक आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

अजितदादांना कसं ट्रॅक कराल?; सुप्रिया सुळेंनी दिली आयाडिया!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube