दौंडमध्ये बनावट लग्न करुन नवरदेवाला लाखोंचा गंडा : तोतया नवरीसह पाच जणांना अटक
दौंड : लग्न जमत नसलेल्या मुलाशी लग्न करुन त्याला आर्थिक गंडा घालणाऱ्या तोतया नवरीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. देलवडी (ता. दौंड) येथे हा प्रकार घडला आहे. तर अन्य चार आरोपींचा शोध सुरु आहे. आशा निकम, ज्योती लोखंडे, मेधा सोळंखी, आकाश कोटे आणि चित्रा अंभोरे (तोतया नवरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दौंड न्यायालयाने या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आशा निकमवर अशाच पद्धतीने याआधी फसवणूक केल्याचा एक गुन्हा नाशिक जिल्ह्यातील वडनेर पोलिस ठाण्यात दाखल असल्याची माहिती मिळत आहे. (Five people have been arrested, including a fake wife who married and cheated with boy financially)
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बाबू चव्हाण यांनी 25 नोव्हेंबरला इच्छुक नवरदेवाला लग्न जमवून देतो असे आश्वासन दिले. पण त्यासाठी दोन लाख रुपये घेऊ असे सांगितले. त्यापूर्वी अॅडव्हान्स म्हणून चव्हाणला पाच हजार रुपये दिले. तिथून तीन दिवसांमध्येच ‘नवरी पाहिली आहे. दोन लाखांची व्यवस्था करा,’ असे चव्हाणने संबंधित मुलाला सांगितले. त्यानंतर 13 डिसेंबर रोजी मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला आणि त्याचदिवशी नाशिकमध्ये लग्नही लावून देण्यात आले. त्यामुळे नवरदेवाने बाबू चव्हाण आणि विवाह संस्थेला दोन लाख रुपये मिळाले.
लोकसभेच्या उमेदवारांच्या यादीचा मुहूर्त ठरला! भाजप ‘या’ दिवशी यादी जाहीर करणार
पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर दौंड तालुक्यातील घरी येत असताना नवरी अनोळखी नंबरवर व्हॉट्सॲप चॅटिंग करत होती आणि लोकेशन पाठवत होती. नवरदेवाला या गोष्टीचा संशय आला. हा प्रकार बराच वेळ सुरु राहिल्यानंतर त्याने घरातील लग्नाची पूजा थांबवली. 17 डिसेंबरला सायंकाळी या तोतया नवरीचे कथित पाहुणे घरी आले. त्यांनी नवरीला दागिने करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. पण मुलाने नकार दिल्यानंतर पाहुण्यांनी दमदाटी केली.
‘ओबीसो असो वा मराठा समाज…’; आरक्षणावर खासदार विखेंचे मोठे विधान
पण या साऱ्या प्रकाराचा संशय आल्याने संबंधित मुलाच्या जवळचे नातेवाईक संतोष पवार यांनी यवत पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत या टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी तपासाअंती नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून तोतया नवरीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बाबू चव्हाण (रा. यवत), सिंधू माळी (रा. कोरेगाव भीमा), सांडू यशवंत जाधव (रा. मड, जि. बुलडाणा), सतीश मधुकर जोशी (रा. अशोकनगर, जि. नाशिक) या चौघांचा शोध सुरु आहे.