माय होम इंडियाकडून औंध येथे मोफत आरोग्य तपासणी, नागरिकांचा मोठा प्रतिसाद
पुणे : माय होम इंडिया (My Home India) स्वयंसेवी संस्थेकडून औंध येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. यावेळी विविध आजारांची तपासणी, त्यांचे निदान व औषध विषयक सल्ला देण्यात आला. स्थानिक नागरिकांकडून देखील या शिबिराला प्रतिसाद मिळाला.
संस्थेचे संस्थापक सुनील देवधर (Sunil Devdhar) यांच्या संकल्पनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी हे आरोग्य शिबिर भरविण्यात आले होते. यावेळी वस्तीतील अनेक नागरिकांनी शिबिरात सहभाग घेत, आरोग्य सेवांचा लाभ घेतला. डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या या तपासणीनंतर स्थानिक नागरिकांनी देखील याविषयी समाधान व्यक्त केले.
वस्ती भागामध्ये नागरिकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. अनेकदा वस्तीमध्ये लोकांचे हातावरील पोट असल्यामुळे खर्चाला घाबरून ते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. लहान मोठे आजार अंगावर काढण्याची त्यांना सवय झालेली असते. त्यामुळे वस्ती पातळीवर अशी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे राबवल्यास येथील नागरिकांना त्याचा खूप चांगला लाभ होतो. याचबरोबर सुनील देवधर यांच्याकडून अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजक केले जाते. त्याचा सर्वांना फायदा होत असतो.