नऊ वर्षांची दुर्वा अन् नव्वद वर्षांची दुर्गा सुनील देवधरांच्या भेटीला; कारणही आहे खास

  • Written By: Published:
नऊ वर्षांची दुर्वा अन् नव्वद वर्षांची दुर्गा सुनील देवधरांच्या भेटीला; कारणही आहे खास

पुणे : आगामी लोकसभेसाठी पुण्यातून सुनील देवधर (Sunil Deodhar) यांचे नाव चर्चेत आहे. आपल्या राष्ट्रवादी विचारांसाठी सुपरिचीत सुनील देवधर यांची समाज माध्यमांवर देखील लोकप्रियता वाढत असून, युट्यूबवरील त्यांची व्याख्याने ऐकून पुणे शहरातील नऊ वर्षांची लहानगी दुर्वा आणि नव्वद वर्षांच्या दुर्गा आजींनी खास देवधर यांची भेट घेतली. यावेळी देवधर यांनी दुर्गाबाईना साष्टांग नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच लहानग्या दुर्वाचा वाढदिवस असल्यामुळे देवधर यांनी पुस्तकांचा संच तिला जन्मदिवसाची भेट म्हणून दिला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून धनगर समाज बांधवांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी पुण्यात आयोजित ‘सकल धनगर समाज’ मेळाव्यात ही भेट झाली.

राम मंदिरानंतर आता लक्ष्य पुण्येश्वराचे मंदिर! सुनील देवधरांचा पुणेकरांसाठी निश्चय

धनगर समाजावर मोदी कोणताही अन्याय होऊ देणार नाहीत : सुनील देवधर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) धनगर समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाहीत असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केला आहे. मोदी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी दाखवलेल्या मार्गावरच वाटचाल करत असल्याचेही देवधर म्हणाले. धर्माचा आणि कर्माचा समतोल ‘सब का साथ सब का विकास’ या मंत्रानुसार ते सर्व समाज घटकांचा विकास करत असल्याचेही देवधर म्हणाले.

जन्मभूमीनंतर आता पुणे कर्मभूमी बनवायचीये; खासदारकीसाठी देवधरांची जोरात फिल्डिंग

देवधर म्हणाले की, सर्व समाज घटकांना समान संधी देण्याची भूमिका मोदींनी घेतली असून, धनगर समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय ते कधीही होऊ देणार नाहीत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतीय संस्कृतीच्या रक्षणाचे महान कार्य केले. त्याच बरोबर सामान्य नागरिकांचा विकास व्हावा यासाठी देखील त्या सदैव प्रयत्नशील होत्या. अहिल्यादेवींनी दाखवलेला मार्ग स्वीकारत त्यांच्यानंतर देशातील तीर्थक्षेत्रांचा व सामान्य नागरिकांचा विकास करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचे देवधर म्हणाले.

सुनील देवधरांची लोकसभेसाठी जोरदार तयारी : रविवारी नमो बाईक रॅलीची आयोजन

धनगर समाजामध्ये उद्योग क्रांती घडली पाहिजे. त्यामुळे धनगर समाजाने आपल्या सामाजिक उन्नतीविषयी उदासीन राहणे सोडून द्यावे व विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत असे मत अॅड. विजय गोफणे यांनी व्यक्त केले. धनगर समाजाने कायमच देशाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान दिले आहे. समाज बांधवांनी पुढे येऊन सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपला विकास साधावा, त्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा आपण करू, असे मत भाजपा प्रदेश सचिव नवनाथ पडळकर यांनी व्यक्त केले.

Pune Loksabha : तुम्ही पक्षाचे धक्कातंत्र पाहिले आहे ना ? सुनील देवधरांनी पुण्यात शड्डू ठोकला !

यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, भाजप शहर उपाध्यक्ष ऍड गोविंद देवकाते, महा ऍग्रीचे व्यवस्थापकीय संचालक अॅड. विजय गोफणे, भटके विमुक्त विकास परिषदेचे स्वामी धनगर हे उपस्थित होते. यावेळी समाजासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सुनील देवधर यांच्या हस्ते करण्यात आला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube