जन्मभूमीनंतर आता पुणे कर्मभूमी बनवायचीये; खासदारकीसाठी देवधरांची जोरात फिल्डिंग

  • Written By: Published:
जन्मभूमीनंतर आता पुणे कर्मभूमी बनवायचीये; खासदारकीसाठी देवधरांची जोरात फिल्डिंग

पुणे : पुणे शहर माझी जन्मभूमी आणि आता कर्मभूमी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचे असल्याचा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर (Sunil  Deodhar) यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यातून सुनील देवधर यांचे नाव चर्चेत आहे. त्यानंतर आता जन्मभूमीनंतर पुण्याला कर्मभूमी बनवण्याचा निर्णय देवधरांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानामुळे खासदारकीसाठी देवधरांनी आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे. विकसित भारतासाठी मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे तिसरे पर्व येणे आवश्यक असल्याचेही देवधर म्हणाले. (BJP Leader Sunil Deodhar On 2024 Loksabha Election)

Pune Loksabha : तुम्ही पक्षाचे धक्कातंत्र पाहिले आहे ना ? सुनील देवधरांनी पुण्यात शड्डू ठोकला !

ते म्हणाले की, काँग्रेसने देशाला 60-65 वर्षे लुटले असून, केवळ भोगवस्तू मानून खुर्चीचा उपभोग घेतला असा घणाघात भाजपचे नेते सुनील देवधर यांनी केला आहे. पदाच्या खुर्चीचा देशासाठी उपयोग करणारे अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांच्यानंतर देशासाठी मिळालेल्या पदाची पराकाष्ठा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) असल्याचे देवधर म्हणाले. सुनील देवधर यांचे मोठे बंधू आनंद देवधर यांनी लिहिलेल्या “तिसऱ्या पर्वाकडे…” या पुस्तकाचे प्रकाशन, पुण्याचे माजी खासदार प्रदीपदादा रावत, ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

WhatsApp Image 2024 01 29 At 5.24.00 PM

मोदी हे सांस्कृतिक राष्ट्रवादाला धरून, देशासाठी काम करत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मोठ्या संख्येने मंदिरांचे जिर्णोद्धार केले. त्यांच्यानंतर मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे कार्य नरेंद्र मोदी करत असल्याचे देवधर म्हणाले. मोदींनी देशवासियांमध्ये स्वत्वाची जाणीव करून दिली आहे. त्यांचे नेतृत्व प्रामाणिक व पारदर्शक आहे. तिसरी आर्थिक महासत्ता बनण्याची क्षमता देशात आहे. हे आव्हाने सोपे नाही, परंतु नरेंद्र मोदी ही आव्हाने कमी वेळात हाताळू शकतील. काँग्रेसने विकासाला समाजवादी विचारांचे साखळदंड घातलेले होते, त्यामुळे त्यांच्या काळात विकास झाला नसल्याचे मत माजी खासदार रावत यांनी व्यक्त केले.

Pune Lok Sabha : सुनील देवधरांनी ताकदीने दंड थोपटले : मुरलीधर मोहोळांची मात्र जपून पावलं

मी केवळ चार जाती मानतो, शेतकरी, युवा, महिला आणि गरीब असे मोदीजी म्हणतात. त्यामुळे मागील पावणे दहा वर्षांच्या काळात मोदींनी ज्याकाही योजना आखल्या, त्या या वर्गासाठी आहेत. अंत्योदयाचा विषय प्रत्यक्षात राबवण्याचे कार्य, नरेंद्र मोदी करत असल्याचे लेखक आनंद देवधर म्हणाले. राष्ट्र हे तेव्हाच घडते, जेव्हा त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची अस्मिता जागी होते. मोदी हे राजधर्माचे पालन करणारे नेते असून, त्यांनी भारतीय नागरिकांची अस्मिता जागी केली असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube