पिंपरी-चिंचवडमधील दुर्घटनेची होणार उच्चस्तरीय चौकशी, सरकारकडून किती आर्थिक मदत मिळणार ?
पुणेः पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) तळवडे येथील फायर कँडल बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. यात सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा समावेश आहे. हा कारखाना विनापरवाना असल्याचे समोर आले आहे. या घटनेची आता सरकारस्तरावर दाखल घेण्यात आली आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे आदेश दिले आहेत.
Sanjay Raut Vs Nitesh Rane : आता मोईत्रानंतर संजय राऊतांचा नंबर, नितेश राणेंकडून ट्वीट
केकवरील फायर कँडल बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील अशा शब्दांत उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
भाजपच्या नऊ खासदारांना दिली बंगले रिकामे करण्याची नोटीस, हे आहे कारण…
पाच लाखांची आर्थिक मदत
पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
आग नेमकी कशामुळे लागली ?
हा कारखाना अनधिकृतपणे सुरू असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. या घटनेबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार या गोदामाचा वापर वाढदिवसाच्या केकसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅण्डलचे हे गोदाम दिसत आहे. सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्यांना ससून आणि इतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाकडून माहिती मिळाल्यानंतरच मृतांचा नेमका आकडा सांगता येईल. मृतांची नावं अद्याप समजू शकले नाहीत, असं सिंह म्हणाले.