पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप अन् दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चुरस कुणाला किती जागा?
Pimpri-Chinchwad या निवडणुकांच्या निकालाची यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे
How many seats will be contested between BJP and both NCPs in Pimpri-Chinchwad : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर आज 16 जानेवारी रोजी राज्यभरात उत्सुकता लागली आहे. या निवडणुकांच्या निकालाची यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेली महानगरपालिका कोण जिंकत? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मोठी बातमी! इचलकंरजी – कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी
दरम्यान या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली होती. तर भाजप आणि शिंदेसेना हे वेगवेगळे लढत होते. तर सुरुवातीला हाती आलेल्या कालानुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आणि दोन्ही राष्ट्रवादी यांच्यामध्ये चुरस निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. याठिकाणी 128 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये भाजप 13 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची युती 12 जागांवर शिंदे यांची शिवसेना 2 जागेवर तर काँग्रेस, मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांची युती यांनी अद्याप कोणत्याही खातं खोलू शकलेली नाही.
