Kalyani Nagar Accident : डॉ. हळनोरच्या कबुलीने चौकशीचा फास घट्ट होणार; म्हणाला, दोन दिवस…

  • Written By: Published:
Kalyani Nagar Accident : डॉ. हळनोरच्या कबुलीने चौकशीचा फास घट्ट होणार; म्हणाला, दोन दिवस…

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत असतानाचा आता पोलीस कोठडीत असणाऱ्या  डॉ. श्रीहरी हळनोरने मोठी कबुली दिली आहे. ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉ. तावरेचा माझ्या दबाब होता असे हळनोरने सांगितले आहे. डॉ. तावरे आणि विशाल यांचे बोलणे झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी माझ्यावर तावरेंनी दबाव टाकल्याची कबुली हाळनोरने दिली आहे. त्यानंतर मी रक्ताचे सॅम्पल बदल केले, पण माझ्या मनाला ते पटत नव्हते. माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे मला वाटत असल्याचेही  हाळनोरने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले आहे. या घटनेनंतर मी दोन दिवस झोपू शकलो नाही असेही डॉ. हाळनोर याने चौकशीत सांगितल्याचे पोलीस अधिकारी सांगत आहेत.  (Sassoon Hospital Dr. Shrihari Halnor Says Dr. Ajay Taware Give Pressure To Change Blood Sample )

ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे सक्तीच्या रजेवर; विरोधी पक्षनेते वडेट्टीवार भडकले

अनेक प्रश्न उपस्थित

अपघात घडल्यानंतर अल्पवयीन आरोपीस तपासणीसाठी ससूनमध्ये आणण्यात आले होते. त्यावेळी तेथे रक्त तपासणी विभागातील संबंधित डॉक्टरांनी अल्पवयीन कार चालकाचे ब्लड सँपल घेतले होते. मात्र ऐनवेळी आलेल्या खासगी इसमांनी संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकत हे सँपल बदलण्यास भाग पाडले. त्यामुळे बदलेले सॅम्पल कुणाच्या सांगण्यावरून रुग्णालयात आले? डॉक्टरांवर नेमका कुणाचा दबाव होता असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बदलेले ब्लड सॅम्पल आरोपी मुलाच्या आईचं? 

पुणे अपघातातील धक्केदायक खुलासे काही थांबायचं नाव घेत नाहीत. मुलाच्या जमीन घटनेने पेट घेतलेलं हे प्रकरण रोज एक नवं वळण घेतंय. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण गाजत असताना आता यामध्ये नवीन धक्कादायक माहिती समोर आलीये. (Pune Accident) जे ब्लड सॅम्पल बदललं ते कुणाचं आहे याची चर्चा रंगली असतानाच ते दुसरं-तिसरं कुणाचं नसून आरोपी मुलाच्या आईचेच असल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे. (Blood sample) धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ब्लड सॅम्पल हेराफेरीप्रकरणी मोठी कारवाई! ससूनचे डीन बदलले, तावरेसह तिघे निलंबित

यानंतर आता अल्पवीयन आरोपीच्या आईची चौकशी होण्याची शक्यता आहे. मात्र, चौकशीच्या भीतीमुळे शिवानी अग्रवाल बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.   ड्रायव्हरला धममकावल्याप्रकरणी क्राइम ब्रँच टीमकडून शिवानी अग्रवाल यांचाही तपास होणार आहे. त्यामुळे, पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेईल, या भीतीने त्या सध्या बेपत्ता आहेत. शिवानी अग्रवाल यांचा फोन देखील बंद आहे. त्यामुळे, मुलाची आई व विशाल अग्रवाल यांच्या पत्नी नेमकं कुठं गायब झाल्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Video : कल्याणीनगर अपघात प्रकरण कुणी दाबलं?; ससूनचे डीन डॉ. काळेंनी सांगितली Inside Story

निबंध लिहायला लावणाऱ्यांचीही चौकशी होणार

कल्याणी नगर भागात भरधाव पोर्श कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. यानंतर कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीस बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले होते. त्यावेळी संबधित मंडळाने आरोपीस घडलेल्या घटनेवर 300 शब्दांचा निबंध लिहण्यास सांगितले होते. या निकालावर चहुबाजूंनी टीका करण्यात आली होती. या प्रकरणात अनेकांची चौकशी केली जात असून आता, 300 शब्दांचा निबंध लिहण्याचे आदेश देणाऱ्या बाल न्याय मंडळांच्या सदस्यांचीदेखील चौकशी केली जाणार आहे. यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज