Pune Car Accident : निबंध लिहायला लावणाऱ्यांची चौकशी कशी होणार?; नरनावरेंनी सांगितले…
पुणे : कल्याणी नगर भागात 19 मे रोजी पहाटेच्या सुमारास भरधाव पोर्श कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. यानंतर कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीस बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले होते. त्यावेळी संबधित मंडळाने आरोपीस घडलेल्या घटनेवर 300 शब्दांचा निबंध लिहण्यास सांगितले होते. या निकालावर चहुबाजूंनी टीका करण्यात आली होती. या प्रकरणात अनेकांची चौकशी केली जात असून आता, 300 शब्दांचा निबंध लिहण्याचे आदेश देणाऱ्या बाल न्याय मंडळांच्या सदस्यांचीदेखील चौकशी केली जाणार आहे. यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. (Kalyani Nagar Car Accident Panel set up to probe conduct of Juvenile Justice Board members)
Pune News : पुण्यात चाललंय तरी काय? पोलिस आयुक्तालयाजवळच दारुच्या बाटल्यांचा खच…
समिती काय करणार?
बाल न्याय मंडळाच्या सदस्यांच्या वर्तनाची चौकशी करण्यासाठी आणि पुणे कार अपघात प्रकरणात आदेश जारी करताना नियमांचे पालन करण्यात आले होते की नाही हे तपासण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, असे राज्य महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नरनावरे यांनी दिली. मला बाल न्याय कायद्यांतर्गत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सदस्यांच्या एकूण वर्तनाची चौकशी करण्याचे अधिकार असल्याचेही नरनावरे म्हणाले.
या समितीत बाल न्याय मंडळात न्यायव्यवस्थेतील एक सदस्य आणि राज्य सरकारने नियुक्त केलेल्या दोन व्यक्तींचा समावेश आहे. बाल न्याय विभागाने अल्पवयीन मुलाला जामीन दिल्यानंतर तत्काळ राज्याच्या महिला व बालविकास विभागाने गेल्या आठवड्यात पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. विभागातील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली या समितीचा अहवाल पुढील आठवड्यात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Pune : अगरवाल पिता-पुत्राचा मस्तवालपणा कायम : पोलिसांना चौकशीत उडवाडवीची उत्तरे
2 तासांत 14 फोन अन् डॉक्टरनेच दिला रक्त बदलण्याचा सल्ला
पुणे अपघात प्रकरणातील (Pune Accident) आरोपी विशाल अग्रवाल (Vishal Agrwal) आणि ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे (Ajay Taware) यांच्यात दोन तासांत 14 व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून संभाषण झालं असल्याची माहिती सीडीआरमधून समोर आलीयं. या संभाषणादरम्यान, डॉ. तावरे यांनीच विशाल अग्रवाल यांना ब्लड बदलण्याबाबतचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आलीयं. दरम्यान, अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलल्याचा आरोप डॉ. अजय तावरे यांच्यावर ठेवण्यात आलायं. या प्रकरणी डॉ. अजय तावरे यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
“चौकशीला आले होते की पार्ट्या झोडायला?” डॉ. सापळे समितीच्या बिर्याणी मेजवाणीवर धंगेकरांचा संताप
सूनच्या डॉक्टरांनंतर आता शिपायालाही ठोकल्या बेड्या
ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांच्या अटकेनंतर आता येथील शिपाायलाही या प्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप करत डॉक्टरांवर आहे. याच ब्लड सॅम्पल प्रकरणात डॉक्टरांना या शिपायाकडून पैशांची देवाण-घेवाण झाल्याचं उघड झालं आहे. डॉक्टर आणि विशाल अग्रवाल यांच्यात पैशांची जी काही देवाण-घेवाण झाली ती या शिपायाच्या माध्यमातून झाली अशी माहिती समोर आली आहे. अमित घटकांबळे असं या शिपायाचं नाव आहे. अमित वडगाव शेरीतून एका स्विफ्ट कारमधून 3 लाख रुपये रक्कम घेऊन आला होता असं तपासातून उघड झालं आहे. अमित हा ससून रुग्णालयात शवविच्छेदन विभागात शिपाई म्हणून काम करतो. तसंच, तो अतुल यांचा अतिशय निकटवर्तीय मानला जातो.