कोयता गॅंग पुन्हा सक्रीय, दहशत पसरवणाऱ्या टोळक्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Koyta gang : एकीकडे नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या कोयता गॅंगच्या (Koyta Gang) गुंडाची पुणे पोलिसांकडून धिंड काढली जात आहे. असं असूनही पुण्यतात कोयता गॅंग पोलिसांना (Pune Police) न जूमानता आपली दहशत पसरवत आहेत. काही दिवसांपूर्वी आंबेगावच्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन जणांनी हातात कोयदा घेऊन दहशत पसरवल्याची घटना घडली होती, याच घटनेची पुनरावृत्ती काल पुन्हा एकदा पुण्यात घडली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात (Yerawada area of Pune) पुन्हा एकदा कोयता गॅंग ही सक्रिय झाली आहे. या भागात हातात कोयते घेऊन एका तरुणाचा पाठलाग करताणाऱ्या टोळक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Koyta gang is active again, police arrested a gang of 5 people who spread terror)
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये किरकोळ वादानंतर तरुणांची टोळी परिसरात शस्त्रे घेऊन फिरताना दिसत आहे. पुण्यातील गांधीनगर येरवडा परिसरात एका टोळक्याने हातात धारदार शस्त्रे घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन एकाचा पाठलाग करत केला.
Cabinet Expansion : ‘जो साब देगा वो हम लेगा’ : गोगावलेंचं मंत्रीपद कन्फर्म!
ही घटना रविवारी घडली. या लोकांनी हातात कोयते घेऊन परिसरात दहशत निर्माण केली आहे. गांधीनगर परिसरातील एका गल्लीत कोयता धारक व्यक्ती एका तरुणाचा पाठलाग करत होते. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. रस्त्यांवर उभे असलेले लोक कोयता गॅंगला बघून जीव मुठीत घेऊन घरात गेले होते. खरंतर गेल्या काही दिवसांपासून या घटना कमी झाल्या होत्या. मात्र, काल ही घटना घडल्याचं समोर आल्यानं पुन्हा परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच कोयता गॅंगला पोलिसांनी अटक केली आहे. हातात कोयता घेऊन दहशत पसरवणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
काही टोळ्या येरवडा परिसरात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कोयता व इतर शस्त्रे घेऊन डोके वर काढत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. शहराच्या विविध भागात हातात कोयता घेऊन काही व्यक्तींना अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तर आम्हाला गुन्हेगारांपासून वाचवा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. येरवडा परिसरात वाहनांची तोडफोड किंवा तोडफोडीच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळं कोयता टोळीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.