निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले राष्ट्रवादीत प्रवेश करणार; अजितदादा राहणार उपस्थित

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 30T111106.778

Gargi Phule Join NCP :  मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे.

‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली, सरकारकडून….’; नसीरुद्दीन शाह यांचे मोठे विधान

गार्गी फुले यांनी या विषयात पदवी मिळवली आहे. त्या 1998 पासून प्रायोगिक नाट्य चळवळीशी संबंधित आहे. तर सत्यदेव दुबे यांच्या त्या शिष्याही आहेत. समन्वय या नाट्यसंस्थेसह अनेक प्रायोगिक नाटकात गार्गी फुले यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.

‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली, सरकारकडून….’; नसीरुद्दीन शाह यांचे मोठे विधान

गार्गी फुले यांनी अनेक नाटक व मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. गार्गी फुले यांनी मळभ, कोवळी उन्हे, श्रीमंत, सोनाटा वासंसी जीर्णनी, सुदामा के चावल या नाटकातून काम केले आहे. तसेच राजा राणी ची गं जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, तुला पाहते रे, कट्टी बट्टी या टीव्ही मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. या व्यतिरिक्त भाडीपाच्या चिकटगुंडे व राते या वेबसीरिजमध्येही त्यांनी काम केले आहे.

Tags

follow us