अजित पवारांच्या वर्चस्वाला धक्का बसणार?; शरद पवारांचे 12 शिलेदार तयार, वाचा लेट्सअप खबरबात
Letsupp Marathi Khabarbat : ज्या पक्षाची बांधणी पुणे जिल्ह्यात झाली आणि पुढे ती राज्यात विस्तारली. (Sharad Pawar) मात्र, नुकतीच या राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आणि पक्षाचे दोन शकलं झाली. दरम्यानच्या काळात अजित पवारांनी बंड केलं आणि ते सुमारे 40 आमदार सोबत घेत ते भाजपसोबत गेले. ते युतीच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीही झाले. मात्र, हा पवार संघर्ष फक्त राजकीय राहिला नाही तो कौटुंबीक पातळीवर गेल्याचं दिसल ते नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत. (Letsupp Khabarbat) त्यानंतर ही लढाई संपलेली नसून ती वाढणार असल्याचं दिसतय. दरम्यान, याच विषयावर लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी “लेट्सअप खबरबात” या कार्यक्रमात विश्लेषण केलं आहे.
अध्यक्ष पदावरून हकालपट्टी मोहोळांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, मी मदत केली नसती तर चर्चांवर काकडे स्पष्टचं बोलले
बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मताधिक्क्य मिळणार नाही असं सांगितलं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. त्याचवेळी अजित पवार, पत्नी आणि दोन्ही मुलं बाजूला सोडले तर बाकी कुटुंबाने सुप्रिया यांचं काम केलं. त्याच काळात आमदार रोहीत पवार आणि श्रीनीवास पवार, युगेंद्र पवार यांनीही मोठ काम केलं. त्यामुळे येथे सुप्रिया सुळे यांना मोठ मताधिक्य मिळालं. दरम्यानच्या काळात युगेंद्र पवार अजित पवारांच्या विरोधात उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जातीय. हे लक्षात घेता, अजित पवारांनी बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्ष पदावरून युगेंद्र पवारांची हकालपट्टी केली.
राजकीय डाव टाकला
दुसरा मतदारसंघ आहे इंदापूर. येथे भाजपचे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांनी मोठ काम केलं. मात्र, ते सुनेत्रा पवार यांना मताधिक्क्य देऊ शकले नाहीत. दरम्यान, सुरूवातीला सुप्रिया सुळे यांच्यासोबत असलेले इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती दशरत माने यांनी बाजू बदलल्यानंतर शरद पवारांनी राजकीय डाव टाकला. येथील हर्षवर्धन पाटलांचे मामा आप्पासाहेब जगदाळे शरद पवारांच्या बाजूने हटले आणि त्यांनी सुप्रिया पवार यांचं काम केलं. त्यामुळे ते विधानसभेला शरद पवार गटाचे आमदार असतील हे बोललं जातय.
खडकवासला विधानसभा https://www.youtube.com/watch?v=3JmhZn2yHJ4
पुरंदर मतदारसंघात विजय शिवतारेंनी बंडाच निशान फडकावलं होत. परंतु, ते काही फडकत राहीलं नाही. ते हवेतच विरलं आणि त्यांनी महायुतीचं काम केलं. येथील काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी मोठं काम करत सुप्रिया सुळे यांना चांगल लीड दिलं. त्यामुळे तेथे जगताप हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी कांग्रेसच्या संग्राम थोपटे यांनीही चांगलं काम केलं. त्यामुळे येथे थोपटेंनाच राष्ट्रवादी साथ देणार. त्याचबरोबर गेल्यावेळी खडकवासला विधानसभेची निवडणूक लढवलेले सचिन दोडके यांनी सुप्रिया सुळे यांना चांगल मताधिक्य मिळवून दिलं. सुनेत्रा पवारांना मोठी अपेक्षा असताना त्यांना रोखण्यात दोडके यांना यश आलं.
बाकी लोक पवारांना सोडून गेले जरांगे पाटलांनी नाही तर जानकरांनी जातीवाद केला; लेट्सअप चर्चेत जाधव थेटच बोलले
शिरूर मतदारसंघात अनेक मोठे नेते अजित पवारांच्या बाजूला गेले असताना अमोल कोल्हे हे लोकसभेला निवडून आले आहेत. तसंच, येथे देवदत्त निकम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काम केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निकम हेच पवारांकडून उमेदवार असतील हे निश्चित मानलं जातय. त्याचबरोबर जुन्नर मतदारसंघातही अतुल बेनके यांनी शरद पवारांची साथ सोडली. आता तेथे शरद पवार कोण उमेदवार देणार असा प्रश्न असला तरी बेनके यांना मोठ आव्हान निर्माण होईल असंही बोललं जातय. यामध्ये सर्वात चर्चेत राहीले ते अशोक पवार. ते एकमेव आमदार आहेत जे शरद पवार गटाकडं थांबले. अन्यथा बाकी लोक पवारांना सोडून गेले. परंतु, अशोक पवारांना येथून शरद पवार गटाकडून असेल हेही निश्चित मानलं जात आहे.
हडपसर विधानसभा
हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार चेतन तुपे यांनी पवारांची साथ सोडली ते अजित पवारांकडे गेले. त्यानंतर शरद पवारांनी नवीन चेहऱ्याची चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये, नगरसेवर योगेश ससाने आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप. यांनी चांगली बाजू लावून धरल्याने कोल्हे यांना चांगला फायदा झाला. दुसरा मतदारसंघ आहे भोसरी. या मतदारसंघातील सर्व नेते अजित पवार गटाकडून असतानाही आढळराव पाटलांना मताधिक्य मिळालं नाही. या शिरूरमध्ये कोण उमेदवार असेल अशी चर्चा आहे. त्यामध्ये विलास लांडे यांचं नाव आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत तटस्त भूमिका घेतली होती. मात्र, ते शरद पवार यांच्याकडे जाऊन उमेदवारी घेऊ शकतात असंही बोललं जातय. त्यामुळे पवारांकडे जुने आणि काही नवे शिलेदार आहेत. ते विधानसभेत कसा निकाल दाखवतात हे पाहणं महत्वाचं आहे.