तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र्य यंत्रणा; पुण्यातील अकार्यश्रम नगरसेवकांवर फडणवीस गरजले
Devendra Fadnavis Warns Former Pune Corporator: राज्यात प्रथमच पाच टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीमध्ये पुण्यातील मतदारसंघांचे दोन टप्प्यांत विभाजन झाले. (Lok Sabha Elections 2024) पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघासाठीचे मतदान सात मे रोजी, तर उर्वरित पुणे, शिरूर, मावळ या मतदारसंघांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. महायुतीच्या तिन्हीही उमेदवार निवडून आणलं पाहिजे. आणि जो काम करेल, त्याचा निकाल शंभर टक्के उत्तम असणार आहे, त्यामुळे त्यांच्या पाठिशी मी आहे. मात्र ‘भाजप’ नाही म्हणून मित्रपक्षांचे चिन्ह पोहोचले नाही, अशी कारणे नको आहेत, पण पुण्यातील उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आला पाहिजे. तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र्य यंत्रणा राबवली आहे, अशा अकार्यश्रम नगरसेवकांवर फडणवीस (Devendra Fadnavis) गरजले.
पुण्यातील एका अलिशान हॉटेलमध्ये महायुतीच्या कार्यकर्ते आणि आजी- माजी नगरसेवकाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये महापालिकेचे माजी नगरसेवक देखील हजेरी लावली. आणि जे पदाधिकारी गैरहजर होते, ते का हजर नाहीत, याची माहिती यावेळी फडणवीस यांनी या वेळी घेतली. या बैठकीमध्ये फडणवीस यांच्या सोबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ, कार्यकर्ते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे आणि ५० पेक्षा जास्त माजी नगरसेवकांनी हजेरी लावली होती.
पुणे लोकसभा मतदारसंघातील काही नगरसेवकांची प्रचाराच्या वेळेस हलगर्जीपणाविषयी फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘या प्रचारामध्ये माझे सर्वांवर करडी नजर आहे. त्यासाठी आपली स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे. कोण काय करत आहे, याची थेट माहिती मला मिळत आहे. प्रचारामध्ये छोट्या सभा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. अगदी 15 ते 20 नागरिकांना एकत्र करून त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेणे महत्वाचे आहे. अशा लहान- मोठ्या सभांचा फायदा नागपूर उत्तम झाला आहे. नागपुरामध्ये लहान- मोठ्या सभांतून नऊ लाख नागरिकांपर्यंत थेट पोहोचता आल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
भोर शहरात सुनेत्रा वहिनींचा प्रचार; फटाक्यांच्या आतषबाजीत नागरिकांनी केलं स्वागत
पुण्यात देखील अशाच प्रकारे लहान- मोठ्या सभेतून प्रचार आवश्यक आहे. पुढील आठवडाभरात मोठ्या संख्येने अशा सभा पार पाडावे,’ अशी अपेक्षा त्यांनी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांकडून असल्याचे सांगितले. या सर्व गोष्टी करत असताना कोणाला काही अडचण असेल, तर त्या सोडविण्यासाठी याठिकाणी चंद्रकांत पाटील असल्याचे सांगितले आहे. परंतु, मतदारसंघातील काम व्यवस्थित करायचं आहे. असे म्हणत फडणवीस यांनी यावेळी नगरसेवकांना खडसावले आहे.