Lok Sabha Elections 2024: ‘आढळराव निवडून येतील, पण लीड सांगायला मी ज्योतिषी नाही’

Lok Sabha Elections 2024: ‘आढळराव निवडून येतील, पण लीड सांगायला मी ज्योतिषी नाही’

Ajit Pawar on Shivajirao Adhalrao Patil : २०१९ च्या लोकसभा निवडणु (Lok Sabha Elections) शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवणारे शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यंदा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहे. त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाने उमेदवारी दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आढळराव पाटील विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, त्यांना किती मते मिळतील, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असं ते म्हणाले.

हनुमान जयंतीला पोलिसांचाही जल्लोष! समाजवादी जन परिषदेने घेतली हरकत, कारवाईची मागणी 

महाराष्ट्रातही प्रचार शिगेलो पोहोचला असून शिरुर हा लोकसभा मतदारसंघ विशेष चर्चेत आहे. आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत शिरूरचे उमेदवार आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना अजित पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना आढळराव पाटील किती मताधिक्याने विजयी होतील, असा प्रश्न विचारला. त्यावर बोलतांना ते म्हणाले, एक मिनिट… मी त्यामधला ज्योतिषी नाही, पण, आमचा उमेदवार निवडून येईल, एवढचं मला माहिती आहे, असं उत्तर अजितदादांनी दिलं.

Lok Sabha Election : लोकशाहीचे नाही तर विरोधकांचे अस्तित्व धोक्यात; विखेंचा हल्लाबोल 

आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीरनामा जाहीर केला. त्यावरून भाजपने पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्लाबोल केला. मात्र, यासंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, माझा त्या पक्षाशी काहीही संबंध नाही, मी तो जाहीरनामा वाचला नाही, तो वाचल्याशिवाय मी त्यावर काही बोलणार नाही, असं म्हणत भाष्य करणं टाळलं.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात आढाळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात थेट लढत आहे. गेल्या निवडणुकीत आढळराव पाटलांना धोबीपछाड करून कोल्हे दिल्लीत पोहोचले होते. आता यंदाही दोन्ही उमेदवार एकमेकांना आव्हान देत आहेत. मात्र, गेल्या निवडणुकीत कोल्हे यांना पाठिंबा देणारे अजित पवार यंदा आढळराव पाटलांचा प्रचार करत आहेत. त्यामुळं शिरूरमध्ये विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube