VIDEO : धबधब्याखाली गेलेले पाच जण कसे वाहून गेले ! 29 सेकंदाचा थरकाप उडविणारा व्हिडिओ
Lonavala Bhushi Dam backwater falls 4 childrens and a women drowned : पावसाळ्याच्या रमणीय वातावरणामध्ये पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मात्र यामध्ये लोणावळ्यातून (Lonavala) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोणावळ्यातील भुशी डॅम (Bhushi Dam) परिसरातील बॅकवॉटर धबधब्यामध्ये पुण्यातील सय्यदनगर भागातील चार लहान मुलांसह एक महिला बुडाल्याची घटना घडली आहे.याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. धबधब्यावरून हे पाच जण कसे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत, त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.
धबधब्याखाली गेलेले पाच जण बुडाले, लोणावळ्यातील भुशी डॅम येथील धक्कादायक घटना घडलीय, याचा व्हिडिओ आता समोर आलाय. लोकांच्या डोळ्या देखत पाच जण वाहून गेलेत.#bhushidam #punepolice #lonvala pic.twitter.com/Ax5l5QBNQt
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 30, 2024
लोकसभेच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, ‘आमचे पाय…’
या बुडालेल्या लोकांमध्ये 4 ते 13 वर्ष वयोगटातील तीन मुली, एक मुलगा तसेच एका महिलेचा समावेश आहे. यापैकी महिला आणि एका तेरा वर्षीय मुलीचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे. मात्र अद्यापही अन्य तिघांचा शोध सुरूच आहे. या घटनेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार हे बुडालेले लोक पुण्यातील हडपसर येथील सय्यद नगरमधील अन्सारी कुटुंबातील आहेत. शाहिस्ता लियाकत अन्सारी (वय वर्ष 36), अमीमा आदिल अन्सारी (वय 13), अदनान सभाहत अन्सारी (वय 04), मारिया अकिल सय्यद (वय 09), उमेरा आदिल अन्सारी (वय 08) असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत. त्यातील शाहिस्ता अन्सारी या महिलेचा, अमिमा आणि उमेरा या दोन मुलींचा मृतदेह सापडले आहेत. तर दोन मुलींच्या मृतदेहाचे शोध उशीरापर्यंत सुरू होता.
रोहित-विराट पाठोपाठ रवींद्र जडेजाचाही मोठी घोषणा; T20 International cricketमधून निवृत्ती
रविवारी ते भुशी धरणावर पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेले असता दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारासते या प्रवाहात उतरले. मात्र प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील सातही जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यश आलं. मात्र दुर्दैवाने पाच जण वाहून गेले.
पैशांशिवाय निबंधाची शिक्षा अशक्य; पुणे अपघात प्रकरणी राज ठाकरेंचे न्यायाधिशांवरही ताशेरे
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर यावेळी पोलिसांना शिवदुर्ग मित्र बचाव पथकाने शोध कार्य करण्यास मदत केली. संशोधन पाऊस सुरू असल्याने या बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत. या घटनेनंतर परिसरातील लोकांसह पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.